कष्टकऱ्यांसाठी 10 रुपयांत जेवण, मुंबईकरांसाठी हक्काची घरं, 5 वैद्यकीय महाविद्यालये, सर्वात मोठं ग्रंथालय, ठाकरेंचं व्हिजन
Aaditya Thackeray and Amit Thackeray Interaction with candidates : त्यानंतर यामध्ये सुधारणा करुन मुंबई महानगरपालिकेचा वचननामा मुंबईकरांसमोर सादर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मुंबईकरांसाठी कोणत व्हिजन मांडलं? सर्व मुद्दे जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कष्टकऱ्यांसाठी 10 रुपयांत जेवण, मुंबईकरांसाठी हक्काची घरं
5 वैद्यकीय महाविद्यालये, सर्वात मोठं ग्रंथालय, ठाकरेंचं व्हिजन
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपण जनतेसाठी काय करणार? याबाबत आश्वासन देण्यास केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात महापालिकेच्या उमेदवारांसमोर प्रेझेंटेशन सादर केलंय. यामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी मुंबई महापालिकेची सत्ता आल्यानंतर काय करायचं? याबाबतची माहिती नगरसेवकांसमोर सादर केली. दरम्यान, हीच माहिती शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर यामध्ये सुधारणा करुन मुंबई महानगरपालिकेचा वचननामा मुंबईकरांसमोर सादर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मुंबईकरांसाठी कोणत व्हिजन मांडलं? सर्व मुद्दे जाणून घेऊयात..
आदित्य आणि अमित ठाकरेंनी प्रेझेंटेशनमध्ये मांडलले मुद्दे
मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचा-यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार. मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल. पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.
परिवहन - खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
तिकीट दरवाढ कमी करून रू. 5-10-15-20 फ्लॅट रेट ठेवणार










