पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या इच्छूक उमेदवाराने एबी फॉर्म गिळला, कार्यकर्त्यांनी काढली समज तरीही...
Pune news : पुण्यात शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य सुरु झालं आहे. एका उमेदवाराला एबी फॉर्म दिल्याचे पाहून दुसऱ्या इच्छूक उमेदवाराने तोंडात एबी फॉर्म टाकून गिळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य
तोंडात एबी फॉर्म टाकून गिळला
Pune News : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांच्या रणधुमाळीत उमेदवारांची मोठी धावपळ सुरु असल्याचं चित्र दिसून आलं होतं. अशातच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका उमेदवाराला एबी फॉर्म मिळाल्याने दुसऱ्या इच्छूक उमेदवाराने हाईटच केली आहे. त्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म गिळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हे ही वाचा : मुंबई हादरली! 'आज हंगामा होगा, 'रात 12 बजे ब्लास्ट होगा, राऊतांच्या घराबाहेरील धुळखात पडलेल्या गाडीवर धमकीचा मेसेज
पुण्यात शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारीवरून इच्छूक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारीवरून वाद झाल्याचं चित्र चव्हाट्यावर आलं आहे. याच गोंधळाच्या वातावरणात एका प्रभागासाठी चुकून किंवा अंतर्गत समन्वयासाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे हे दोघेही एकाच प्रभागातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
तोंडात एबी फॉर्म टाकून गिळला
दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, मच्छिंद्र ढवळे यांना देण्यात आलेला एबी फॉर्म उद्धव कांबळे यांनी अचानकपणे हिसकावून घेतला होता. नंतर उपस्थितांनी आणि काही कार्यकर्ते, तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत देखील काढली होती. तेव्हा त्यांनी तोंडात फॉर्म टाकून तो चावून गिळून टाकल्याचं चित्र समोर आलं. हा प्रकार पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा : पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीवर दिवसाढवळ्या गोळीबार, शहरात खळबळ
संबंधित घटनेची माहिती वरिष्ठ नेत्यांना समजात त्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या शिस्तीची आणि उमेदवारी प्रक्रियेचं गांभीर्य न पाळल्याने शिवसेनेची नामुष्की झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून कायदेशीर कारवाईची शक्यता आहे.










