पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीवर दिवसाढवळ्या गोळीबार, शहरात खळबळ

मुंबई तक

Ahilyanagar crime : पुण्यात 13 फेब्रुवारी 2010 रोजी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला बंटी जहागिरदारवर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले.

ADVERTISEMENT

pune german bakery bomb blast case was shot at
pune german bakery bomb blast case was shot at
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर गोळीबार

point

गोळीबाराच्या घटनेनं परिसरात तणाव 

Ahilyanagar Crime : पुण्यात 13 फेब्रुवारी 2010 रोजी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला बंटी जहागिरदारवर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले. आरोपीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर नेमके कोण होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कसलीही माहिती समोर आली नाही.

हे ही वाचा : मुंबई हादरली! 'आज हंगामा होगा, 'रात 12 बजे ब्लास्ट होगा, राऊतांच्या घराबाहेरील धुळखात पडलेल्या गाडीवर धमकीचा मेसेज

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर गोळीबार

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागिरदारवर गोळीबार करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे हा गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याचे वृत्त आहे.

गोळीबाराच्या घटनेनं परिसरात तणाव 

या गोळीबाराच्या घटनेनं श्रीरामपुरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हा 2010 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याची माहिती जगजाहीर आहे. जहागिरदारवर झालेल्या गोळीबाराने आहिल्यानगरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा : शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला उदयनराजे भोसले यांनी दिलं फ्लाईंग किस, म्हणाले 'पार्टी पाहिजे पार्टी'

हा स्फोट साधासुधा नसून यात निष्पाप नागरिकांचा बळी देखील गेला होता. हा एक भयंकर दहशतवादी हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाच विदेशी नागरिकांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातील दोघेजण हे पुण्यातील असल्याची माहिती आहे. या स्फोटात 56 नागरिक जखमी झाले आणि त्यातील 10 जण विदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp