अतुल सावे अन् भागवत कराड यांची गाडी रोखत शिवीगाळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा
Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election : संतप्त कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी अडवून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनाला काळे फासून निषेध नोंदवण्यात आला. काही वेळासाठी परिसर अक्षरशः तणावपूर्ण बनला होता. आंदोलन अधिक चिघळलं असतानाच एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अतुल सावे अन् भागवत कराड यांची गाडी रोखत शिवीगाळ
निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडल्याने तुफान राडा; कार्यकर्त्यांनी घेरलं
Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election ,छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान सेना-भाजप युती तुटल्यानंतर आता भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट भाजप नेत्यांना घेरण्यास सुरुवात केलीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते थेट नेत्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातत वरिष्ठ नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचं चित्र दिसून आलं.
भाजप नेत्यांची गाडी अडवत शिवीगाळ, तुफान राडा
संतप्त कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी अडवून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनाला काळे फासून निषेध नोंदवण्यात आला. काही वेळासाठी परिसर अक्षरशः तणावपूर्ण बनला होता. आंदोलन अधिक चिघळलं असतानाच एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिस संरक्षणात अतुल सावे आणि भागवत कराड यांनी घटनास्थळावरून माघार घेतली.
उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी नेतृत्वावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. “सर्व्हे आमच्या बाजूने असूनही आम्हाला डावलण्यात आलं”, “नेत्यांच्या पीए आणि नातेवाईकांना तिकीट दिलं जातंय”, असे आरोप करत कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांचे फोटो फाडले. काही संतप्त कार्यकर्त्यांनी एकेरी उल्लेख करत जोरदार शिवीगाळ केल्याचंही यावेळी पाहायला मिळालं.
हेही वाचा : मोठी बातमी : महापालिका निवडणुकीत भाजपने खाते उघडले, मतदानापूर्वीच दोन नगरसेविका विजयी










