कुकरचा स्फोट झाल्याने गंभीररित्या भाजल्या, तरीही राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराने व्हिलचेअरवर येत भरला अर्ज

मुंबई तक

Thane Mahanagar Palika Election 2026 : ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 26 (मुंब्रा–शैलशनगर परिसर) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार संगीता दवणे यांनी गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेतही उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ADVERTISEMENT

Thane Mahanagar Palika Election 2026
Thane Mahanagar Palika Election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुकरचा स्फोट झाल्याने गंभीररित्या भाजल्या

point

तरीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने व्हिलचेअरवर येत भरला अर्ज

Thane Mahanagar Palika Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक महापालिकांमध्ये महायुती आणि महाविकासमध्ये फुट पडली. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना मंगळवार, 30 जानेवारी हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातून जिद्द आणि चिकाटीचे दर्शन घडवणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत.

स्वयंपाक करत असताना अचानक कुकरचा जोरदार स्फोट

ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 26 (मुंब्रा–शैलशनगर परिसर) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार संगीता दवणे यांनी गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेतही उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी सकाळी घरात स्वयंपाक करत असताना अचानक कुकरचा जोरदार स्फोट झाला. या अपघातात त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अंतर्गत असंतोषाचा भडका, इच्छुकांची अन् उमेदवारांचीही डोकेदुखी वाढली

मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख मंगळवारीच असल्याने प्रकृती अनुकूल नसतानाही त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार न घेण्याचा निर्धार केला. मंगळवारी सकाळी रुग्णवाहिकेतून त्या थेट मुंब्रा प्रभाग समितीच्या कार्यालयात दाखल झाल्या. वैद्यकीय कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिलचेअरवर बसून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सादर केला. अपघातानंतरही दाखवलेली ही जिद्द सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp