डाव आखला मोठा, पण लढायला प्यादेच नाहीत; कधी नव्हे ते काँग्रेस अन् वंचितचे सूर जुळले, पण 16 जागांवर मोठा गेम
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने मोठ्या मनाने वंचितला 62 जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस स्वतः 150 जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र, वंचितने 62 पैकी केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल केले असून तब्बल 16 जागांवर उमेदवारच मिळू शकले नाहीत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वंचित बहुजन आघाडीचा अवसानघातकीपणा!
शेवटच्या क्षणी काँग्रेसला कळवलं अन्...16 जागांवर मोठा गेम
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारी (दि.30) संपली आणि त्यानंतर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी युतीतील एक मोठा पेच उघडकीस आला. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईच्या लढतीत कागदावर मजबूत वाटणारी ही युती प्रत्यक्ष मैदानात मात्र कमकुवत ठरल्याचे चित्र दिसत आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर उमेदवार मिळालेले नाहीत.
यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने मोठ्या मनाने वंचितला 62 जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस स्वतः 150 जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र, अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीने काँग्रेस नेतृत्वालाच धक्का दिला. वंचितने 62 पैकी केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल केले असून तब्बल 16 जागांवर उमेदवारच मिळू शकले नाहीत.
मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेत वंचितची संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याचे अनेकदा सांगितले जात होते. तरीही युती टिकवण्यासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने काही भागांत स्वतःची ताकद असतानाही त्या जागा वंचितसाठी सोडल्या. मात्र, या जागांवर प्रत्यक्षात वंचितकडे उमेदवारच नसल्याचे अर्ज प्रक्रियेअंती स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे ही परिस्थिती असूनही अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत काँग्रेसला अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
हेही वाचा : मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता, 2025-26 या वर्षात काय होणार?










