उल्हासनगर महापालिका : 2017 मध्ये कलानी गट ठरलेला किंगमेकर, आता श्रीकांत शिदेंचे नवे समीकरण, कोण मारणार बाजी?
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या 78 इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या 20 असून तीन सदस्यीय प्रभाग 2 व चार सदस्यीय 18 प्रभाग आहेत. 78 जागापैकी 13 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती, 21 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 42 जागा सर्वसाधारण असून त्यापैकी 20 जागा महिलांसाठी आरक्षित आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उल्हासनगर महापालिका : 2017 मध्ये कलानी गट ठरलेला किंगमेकर
आता श्रीकांत शिदेंचे नवे समीकरण, कोण मारणार बाजी?
Ulhasnagar Municipal Corporation : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 16 जानेवारी रोजी सर्व महापालिका निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर उल्हासनगरमध्ये देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेससह इतर पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहे. शिवाय आता काही दिवसांत प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे.
2017 ची निवडणूक आणि सत्तांतर
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने होते. त्यावेळी कलानी गट भाजपसोबत गेल्यामुळे सुरुवातीची अडीच वर्षे भाजपकडे महापौर पद राहिले. मात्र नंतर कलानी गटाने भाजपची साथ सोडून शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने पुढील अडीच वर्षे शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली. 2017 पूर्वी उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता होती आणि दोन्ही पक्षांमध्ये समन्वय होता. मात्र मुंबई, ठाणे आणि नाशिक महापालिकांमध्ये परस्परविरोधी लढत असल्याने उल्हासनगरमध्येही दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्या काळात शहराची जबाबदारी तत्कालीन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि श्वेता शालिनी यांच्याकडे होती. भाजपची एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नातून कलानी कुटुंबाशी युती करण्यात आली आणि भाजपचे 32 नगरसेवक निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे 25, साई पक्षाचे 11, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, आरपीआयचे 3, काँग्रेसचा 1, भारिप बहुजन महासंघाचा 1, पीआरपीचा 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला होता.
उल्हासनगर महापालिकेत आरक्षण आणि प्रभाग रचना
उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या 78 इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या 20 असून तीन सदस्यीय प्रभाग 2 व चार सदस्यीय 18 प्रभाग आहेत. 78 जागापैकी 13 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती, 21 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 42 जागा सर्वसाधारण असून त्यापैकी 20 जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी 7 जागा अनुसूचित जाती (महिला), 1 जागा अनुसूचित जमाती (महिला), 11 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि 20 सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.










