मोठी बातमी : महापालिका निवडणुकीत भाजपने खाते उघडले, मतदानापूर्वीच दोन नगरसेविका विजयी

मिथिलेश गुप्ता

Kalyan-Dombivli Mahanagar Palika Election 2026 : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीआधीच भाजपचे दोन उमेदवार विजयी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

ADVERTISEMENT

Kalyan-Dombivli Mahanagar Palika Election 2026
Kalyan-Dombivli Mahanagar Palika Election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : महापालिका निवडणुकीत भाजपने खाते उघडले

point

मतदानापूर्वीच दोन नगरसेविका विजयी

Kalyan-Dombivli Mahanagar Palika Election 2026 : राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (दि.30) शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आज जोरदार अर्ज दाखल केले. मात्र उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि पक्षांतराचे चित्रही पाहायला मिळाले. अशाच वातावरणात आता कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीआधीच भाजपचे दोन उमेदवार विजयी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या दोन महिला नगरसेविका बिनविरोध विजयी 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 ‘अ’ मधून भाजपच्या रेखा राजन चौधरी या उमेदवार जवळपास बिनविरोध निवडून आल्या आहेत. हा प्रभाग ओबीसी महिला आरक्षित असून, या जागेसाठी रेखा चौधरी यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उद्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून, त्यानंतर अधिकृत विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यानंतर भाजपच्या आणखी एक महिला उमेदवार विजयी झाल्याचं समोर आलंय. प्रभाग क्रमांक 26 - क मधून भारतीय जनता पक्षाच्या उमदेवार आसावरी केदार नवरे या देखील बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

हेही वाचा : पुणे महानगरपालिका : विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटलांना नडणाऱ्या अमोल बालवडकर यांचा पत्ता कट

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी ठरल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात येत आहे. रेखा राजन चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने खाते उघडल्याने राजकीय वातावरण तापले असून, 31 तारखेला कागदपत्र पडताळणीनंतर आणखी काही प्रभागांत बिनविरोध निवडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp