वडील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, पण मुलगा अन् सून कमळ चिन्हावर लढणार! मतदारसंघातून तुतारी गायब
Pune Mahanagar Palika Election 2026 : एकीकडे आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते, तर दुसरीकडे त्यांच्या घरातील सदस्य भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची तयारी करत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार
पण मुलगा अन् सून कमळ चिन्हावर लढणार! मतदारसंघातून तुतारी गायब
Pune Mahanagar Palika Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे ज्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडून आले, तेच चिन्ह आता महापालिका निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातून गायब झालंय. आमदार बापूरसाहेब पठारे स्वतः शरद पवार गटात असले तरी त्यांच्या कुटुंबियांनी मात्र थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करत कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात वेगळीच समीकरणे तयार झाली आहेत.
कारण एकीकडे आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते, तर दुसरीकडे त्यांच्या घरातील सदस्य भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची तयारी करत होते. विशेष म्हणजे, भाजपने आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये, असे धोरण जाहीर केले असतानाही पठारे कुटुंबातील तब्बल तिघांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मतदानापूर्वीच दोन नगरसेविका निवडून आल्या, रवींद्र चव्हाणांचा आनंद गगनात मावेना! थेट देवेंद्र फडणवीसांना फोन
भाजपकडून पठारे कुटुंबात कोणा कोणाला उमेदवारी?
भाजपकडून आमदार पठारेंचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, त्यांची सून ऐश्वर्या पठारे तसेच पठारेंचे भाचे संतोष भरणे यांच्या पत्नीला अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4 (खराडी–वाघोली), ऐश्वर्या सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 3 (विमाननगर–लोहगाव) तर संतोष भरणे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपच्या रिंगणात उतरल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय प्रवास करून पुन्हा शरद पवारांच्या पक्षात परतलेल्या पठारेंनी सांगितले की, “माझा मुलगा सुरेंद्र स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे. मात्र मी स्वतः तुतारी चिन्हाचा आणि माझ्या पक्षाचाच प्रामाणिकपणे प्रचार करणार आहे.” एकाच कुटुंबातील सदस्य दोन प्रमुख राजकीय पक्षांतून एकमेकांसमोर उभे ठाकल्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक केवळ स्थानिकच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहरासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरली आहे.










