महाराष्ट्र हादरला, आंतरजातीय विवाह, पण लग्नानंतर सोनीचा दुसऱ्यावर जीव जडला, दोघांनी मिळून पतीचा काटा काढला
Gadchiroli Crime News : मृतक देवानंद सूर्यभान डोंगरवार (वय 32) याने 2018 साली रेखा उर्फ सोनी हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही वर्षांनंतर रेखाचे विश्वजीत सांगोळे या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, आंतरजातीय विवाह केला
पण लग्नानंतर सोनीचा दुसऱ्यावर जीव जडला
दोघांनी मिळून पतीचा काटा काढला
Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पतीचा खून करुन रस्ते अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र रस्त्यावर आढळलेल्या रक्ताच्या ठशांमुळे हा गुन्हा उघड झालाय. देवानंद सूर्यभान डोंगरवार (वय 32) असं खून झालेल्या पतीचं नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी रेखा उर्फ सोनी आणि तिचा प्रियकर विश्वजीत याला पोलिसांकडून अटक करण्यात आलीये.
सोनीचा प्रियकरावर जीव जडला, पतीसोबत राहण्यास नकार
अधिकची माहिती अशी की, मृतक देवानंद सूर्यभान डोंगरवार (वय 32) याने 2018 साली रेखा उर्फ सोनी हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही वर्षांनंतर रेखाचे विश्वजीत सांगोळे या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. विश्वजीत हा महामार्ग बांधकाम कंपनीत चालक म्हणून काम करत होता. या संबंधांमुळे रेखा पतीपासून दूर गेली. दोन महिन्यांपूर्वी तिने घर सोडून विश्वजीतसोबत कुरखेड्यात राहण्यास सुरुवात केली. देवानंद पत्नीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होता. याबाबत पंचायत आणि तंटामुक्ती समितीपुढेही चर्चा झाली. मात्र रेखाने देवानंदसोबत राहण्यास नकार दिला.
रेखाने आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांची रक्कम मिळाल्याशिवाय विभक्त होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी देवानंद पत्नीला समजावण्यासाठी तिच्या खोलीवर गेला असता तेथे तिघांमध्ये वाद झाला. या वेळी रेखा आणि विश्वजीत यांनी देवानंदच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याची हत्या केली.
हत्या केल्यानंतर दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देवानंदचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवर ठेवून सती नदीजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ नेण्यात आला. तेथे मृतदेह खाली टाकून दुचाकीची तोडफोड करण्यात आली, जेणेकरून हा प्रकार रस्ते अपघात वाटावा. मात्र हत्या झालेल्या ठिकाणापासून पुलापर्यंत रस्त्यावर पडलेले रक्ताचे ठसे पोलिसांच्या निदर्शनास आले. या ठशांच्या आधारे तपास करत पोलिसांनी पत्नी रेखा आणि तिचा प्रियकर विश्वजीत यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. देवानंद हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक आधार होता. कुरखेडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.










