पुण्यात विधवा महिलेनं जीन्स घातली म्हणून दीरानं वहिनीचा मोडला हात, पुरोगामी महाराष्ट्रात लाज आणणारा प्रकार
Pune Crime : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील पुण्यात एक लाज आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. सासूसह दीराने अन् मुलीनेही विधवा महिलेला बेदम मारहाण केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय घडलं?
दीराने विधवा पीडित वहिनीचा मोडला हात
Pune Crime : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील पुण्यात एक लाज आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. सासूसह दीराने अन् मुलीनेही विधवा महिलेला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत पीडितेचा हात मोडल्याचं सांगण्यात येत आहे. नंतर तिला ससून रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तिने केलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी काही राशींतील लोकांच्या इच्छा पूर्ण होणार, तर काहींवर पैशांचा पाऊस पडणार
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. पीडित महिला ही (वय 23) कचरा वेचण्याचे काम करते. तसेच ती तळजाई परिसरात आपल्या चार मुलांसह राहते. तिच्या पतीचे तीन वर्षापूर्वी निधन झाल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. ती 30 डिसेंबर रोजी ती जीन्स घालून घराच्या बाहेर थांबली होती. तेव्हा तिची सासू तिथे आली आणि तिने परिधान केलेली जीन्स बघून तिचा राग अनावर झाला. नंतर तिने केस ओढून पीडितेला बेदम मारहाण केली होती.
हे ही वाचा : भावाच्या मित्राने आधी महिलेच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा, अन् नंतर…
दीराने विधवा पीडित वहिनीचा मोडला हात
पीडितेच महिलेच्या मुलीसह दीर घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत दीराने पीडितेचा डावा हात पिरगळून तिचा मोबाईल फोन काढून घेतला. या मारहाणीत पीडितेनं मनगटाजवळील हाड मोडले. या प्रकरणी आता सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेला ससून रुग्णालयात नेलं आणि तिची वैद्यकीय तपासणी केली असता, मनगटाचे हाड मोडले. पोलिसांकडून आरोपी सासू, दीर आणि मुलीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.










