ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी काही राशींतील लोकांच्या इच्छा पूर्ण होणार, तर काहींवर पैशांचा पाऊस पडणार
Astrology : नवीन वर्षाच्या सुरुवातीला, 2 जानेवारी 2025 हा गुरुवारचा दिवस सर्व राशींसाठी विविध फलदायी संकेत देत आहे.
ADVERTISEMENT

1/5
नवीन वर्षाच्या सुरुवातीला, 2 जानेवारी 2025 हा गुरुवारचा दिवस सर्व राशींसाठी विविध फलदायी संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींना लाभ होईल, तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल.

2/5
मेष राशी :
आज नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या संपत्तीत वाढ होण्याची चांगली शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी प्रलंबित राहिलेली काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे.

3/5
कुंभ राशी
आजचा दिवस आपल्याला जून्या वादातून मुक्त करेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागण्याची शक्यता आहे. तसेच कार्यालयात शत्रूंपासून सावध राहावं. नवीन कामे सुरु केल्यास त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावं.

4/5
वृश्चिक राशी
आज वृश्चिक राशीतील लोकांनी कोणतेही काम श्रद्धेने केल्यास मोठा फायदा निर्माण होईल. तसेच नोकरीत सहकाऱ्यासोबत काम करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. बाहेरचे खाण-पान टाळावं. पोटदुखीच्या समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.

5/5
सिंह राशी
'या' राशीतील लोकांच्या व्यवसायात कोणताही निर्णय शांतपणे विचार करून घेतल्यास फायदेशीर ठरणार आहे. तसेच कोणताही दबाव तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर कागदपत्रे तपासा. नोकरीच्या क्षेत्रात अडथळे निर्माण होण्याची शक्यता. रोजगाराच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील.












