मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! 2026 मध्ये तीन नव्या मेट्रो मार्गिकांची निर्मिती... किती स्थानकांचा समावेश?

मुंबई तक

2026 मध्ये मुंबईकरांसाठी तीन मेट्रो लाइन्स सुरू केल्या जाणार आहेत. यापैकी एक मार्गिका उत्तर मुंबईला भाईंदरशी जोडेल. दुसरी मार्गिका ठाण्यातील घोडबंदर रोडवरून धावेल आणि तिसरी मार्गिका पूर्व मुंबईत असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

तीन नव्या मेट्रो मार्गिकांची निर्मिती...
तीन नव्या मेट्रो मार्गिकांची निर्मिती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

2026 मध्ये तीन नव्या मेट्रो मार्गिकांची निर्मिती...

point

किती स्थानकांचा समावेश असणार?

Mumbai News: नवीन वर्षात मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2026 मध्ये मुंबईकरांसाठी तीन मेट्रो लाइन्स सुरू केल्या जाणार आहेत. यापैकी एक मार्गिका उत्तर मुंबईला भाईंदरशी जोडेल. दुसरी मार्गिका ठाण्यातील घोडबंदर रोडवरून धावेल आणि तिसरी मार्गिका पूर्व मुंबईत असल्याची माहिती आहे. मुंबईत एकूण 350 किमी लांबीच्या 17 मेट्रो मार्गिकांची निर्मिती केली जाणार आहे. यापैकी सुमारे 70 किमी लांबीच्या चार मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत असून आता, नवीन वर्षाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 22 किलोमीटर लांबीच्या तीन मेट्रो मार्गिका सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

पहिल्या टप्प्यात असतील 'ही' स्थानके

पश्चिम मुंबईला पूर्वेकडील किनाऱ्याशी जोडणारी ही मार्गिका ईएसआयसी नगर ते मंडाळा अशी आहे. तसेच, या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात मंडाळा ते चेंबूर अशी पाच स्थानके असतील. हा टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं असून ही मार्गिका 2026 च्या सुरुवातीला कार्यान्वित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये, मंडाळा, मानखुर्द, बीएसएनएल (गोवंडी), शिवाजी चौक (चेंबूर) व डायमंड गार्डन (चेंबूर) अशी स्थानके असतील. 

हे ही वाचा: "तो युट्यूबर माझ्या पत्नीसोबत शहराबाहेर जातो अन्..." पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोलिसांसमोर घातला गोंधळ!

ही एलिव्हेटेड मेट्रो लाईन दहिसर ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदर) पर्यंत आहे. या लाईनच्या पहिल्या टप्प्यातील चार स्थानकांचं बांधकाम पूर्ण झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या लाईनचं उद्घाटन करतील. आचारसंहिता संपल्यानंतर 2026 च्या सुरुवातीला ही लाईन कार्यान्वित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असतील. 

सर्व दहा स्थानकांमध्ये मेट्रो सुरू होणार असल्याचे संकेत 

गायमुख-कासारवडवली-घाटकोपर-वडाळा मार्गाला मेट्रो 4A (मेट्रो 4 ठाणे मेट्रो) म्हणून ओळखले जाते. ही मार्गिका डिसेंबरमध्ये सेवेत दाखल होण्याची अपेक्षा होती. त्याऐवजी, प्रशासनाने पाच स्थानकांमध्ये एक सिम्पल टेस्ट घेतली. या योजनेनुसार, पहिल्या टप्प्यात गायमुख-कासरवडवली-कॅडबरी जंक्शनसह सर्व दहा स्थानकांमध्ये मेट्रो सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp