"तो युट्यूबर माझ्या पत्नीसोबत शहराबाहेर जातो अन्..." पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोलिसांसमोर घातला गोंधळ!
"10 रुपयांचा बिस्किट कितीचा आहे जी?" या व्हायरल डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शादाब यांच्या व्हिडिओमध्ये सहकर्मी म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या पतीने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोलिसांसमोर घातला गोंधळ!
यूट्यूबरसोबत पत्नी दिवसेंदिवस शहराबाहेर असल्याचा पतीचा आरोप
Crime News: मेरठमधील प्रसिद्ध यूट्यूबर शादाब जकाती आता वादात सापडले आहेत. "10 रुपयांचा बिस्किट कितीचा आहे जी?" या व्हायरल डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शादाब यांच्या व्हिडिओमध्ये सहकर्मी म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या पतीने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. मेरठच्या इंचौली परिसरातील रहिवासी खुर्शीद उर्फ सोनू याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला आणि आपल्या पत्नी इरम तसेच शादाब जकाती यांच्यावर आपल्याला जीवघेण्या धमकी देण्याचा आरोप केला.
पतीने पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार...
खुर्शीदने पोलीस ठाण्यात रडत-रडत सांगितलं की, त्याची पत्नी इरम ही शादाबसोबत व्हिडिओ शूटिंगच्या निमित्ताने बरेच दिवस घराबाहेर राहते. काही वेळा तर, ती तीन-चार दिवस देहरादूनसारख्या ठिकाणी जाते. विरोध केल्यावर इरम त्याला शिवीगाळ करते आणि घटस्फोटाची धमकी देते. खुर्शीदने सांगितलं, "माझी पत्नी शादाबच्या सांगण्यावरून मला जीवे मारण्याची योजना आखत आहे. मी हृदयरोगी आहे, मला आणि माझ्या चार मुलांना वाचवा." त्याने पत्नीच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले.
हे ही वाचा: "हिच्या गर्भात जीनचं बाळ..." उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाचं पीडितेसोबत मंदिरात नको ते कृत्य...
पत्नीने पतीचे आरोप फेटाळून लावले
दुसरीकडे, इरमने पतीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने एक व्हिडिओ बनवून त्यात आपलं म्हणणं मांडलं. इरम म्हणाली की, "मी फक्त कामासाठी शादाबसोबत जाते. त्यासाठी मला पैसे मिळतात. मी चार मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे काम करते. शादाब निर्दोष आहेत, ते मला कसलीच जबरदस्ती करत नाहीत. मी स्वतःच्या इच्छेने त्यांच्यासोबत काम करते." तसेच, इरमने तिचा पती खुर्शीदवर मारहाण केल्याचा आणि पैशांची मागणी करण्याचा आरोप केला. ती म्हणाली की, आता तिला खुर्शीदपासून वेगळं व्हायची इच्छा असून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हे ही वाचा: पालघर : सलूनमध्ये 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणं मोठ्या आवाजात वाजवलं, पोलिसांनी आरोपीला उचललं...
इंचौली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवले जात आहेत. हे प्रकरण पती-पत्नीमधील वैयक्तिक वाद आणि व्यावसायिक कामाशी संबंधित असल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या पोलीस आरोपांची व व्हिडिओची सत्यता तपासत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई होईल. शादाब जकाती हे सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओ बनवून प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत, पण अलीकडे त्यांच्यावर विविध वादही झाले आहेत.










