राज्यात 'या' विभागात हवामान बिघडलं, कुठं गारठा तर कुठं अवकाळी संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : 5 जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील हवामान अपडेट जाणून घेऊयात, तो अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवीन वर्षात हवामानात काही प्रमाणात बदल

point

कोकण विभागात हलक्या धुक्यासह ढगाळ वातावरणाचा अंदाज

Maharashtra Weather : नवीन वर्षात हवामानात काही प्रमाणात बदल घडताना दिसून येत आहे. मुंबईसह शहरातील उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशातच 5 जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील हवामान अपडेट जाणून घेऊ.

हे ही वाचा : 'शब्द ठाकरेंचा...' ठाकरे बंधूंनी मुंबईकरांना दिली 'ही' वचनं, वचननामा जसाच्या तसा..

कोकण : 

मुंबईसह कोकण विभागात हलक्या धुक्यासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसेच वातावरणातील गारठा कमी जाणवण्याची शक्यता आहे. किमान तापमान हे 19 अंश तर कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस इतकं राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये हवामान विभागाने कमाल तापमानात वाढ होईल अशी शक्यता वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती जाणवेल.

उत्तर महाराष्ट्र :

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगावात धुळे आहिल्यानगरात सकाळी दाट धुके आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसे किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच गारठा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात धुक्यासह थंडीची अधिक शक्यता आहे. तसेच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp