महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात सुरु होतं सेक्स रॅकेट, 4 मुली अन् 5 मुलं नको त्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

मुंबई तक

UP Crime News : या संपूर्ण प्रकारात महिला आयएएस अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. करारात कुटुंबासह राहण्याची अट असताना, घराचा गैरवापर करून ते देहव्यापाराचे केंद्र बनवण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात अनैतिक देहविक्री प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात सुरु होतं सेक्स रॅकेट

point

4 मुली अन् 5 मुलं नको त्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

UP Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महिला आयएएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानी देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कीडगंज परिसरात असलेल्या या घरावर पोलिसांनी छापा टाकून देहव्यापाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार तरुणी आणि पाच तरुणांना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेण्यात आले आहे.

IAS अधिकाऱ्याचं घर भाड्याने घेतलं, पण देहव्यापार सुरु केला

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश द्विवेदी नावाच्या व्यक्तीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी महिला आयएएस अधिकाऱ्यांकडून हे घर भाड्याने घेतले होते. तो आपल्या कुटुंबासह राहणार असल्याचे सांगून दरमहा 15 हजार रुपये भाडे देण्याचे मान्य करण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस त्याने प्रत्यक्षात कुटुंबीयांना घरात ठेवले, त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणताही संशय आला नाही. मात्र, काही काळानंतर त्याने कुटुंबीयांना अतरसुइया भागातील त्यांच्या जुन्या घरात पाठवले आणि या घरात बेकायदेशीर देहव्यापार सुरू केला.

गेल्या काही आठवड्यांपासून या घरात उशिरापर्यंत तरुण-तरुणींची ये-जा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना संशय येऊ लागला. सतत अनोळखी लोकांची वर्दळ, रात्रीच्या वेळची गडबड आणि संशयास्पद हालचाली यामुळे परिसरातील वातावरण अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर स्थानिकांनी धाडस करून याबाबत पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर प्रयागराज पोलिसांच्या पथकाने संबंधित घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. छाप्यादरम्यान घरातील वेगवेगळ्या खोल्यांमधून चार तरुणी आणि पाच तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. या सर्वांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp