'मराठी माणसांवर सत्ता गाजवण्यासाठी युपी बिहारहून प्रचारासाठी गाड्या', शिवसैनिकाने व्हिडिओ शेअर करत केले आरोप

मुंबई तक

Mumbai Municipal Elections : मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाची काही वाहनं रस्त्यावरून जात आहे. ती वाहनं मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी येत असल्याचं एका नेटकऱ्याचं म्हणणं आहे, ती वाहनं उत्तर प्रदेशातील असल्याचं त्या नंबर प्लेटवरून दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika Election
Mumbai Mahapalika Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'X' ट्विटरवरवरील 'या' आयडीवरून व्हिडिओ व्हायरल 

point

व्हिडिओ तुफान व्हायरल

Mumbai Municipal Elections : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात बघायला मिळत आहे. यापैकी मुंबई महापालिकेकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार असल्याचा प्रचार ठाकरे बंधूंकडून सतत होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचं वक्तव्य करत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी बॉसच्या ओरडा खाव्या लागतील, तर काही राशीतील लोकांना...

'X' ट्विटरवरवरील 'या' आयडीवरून व्हिडिओ व्हायरल 

त्या व्हिडिओमध्ये काही गाड्यांवर उत्तर प्रदेशची नंबर प्लेट दिसत आहे. तसेच त्याच गाड्या या भाजपच्या प्रचारासाठी मुंबईत येताना दिसत असल्याचं चित्र आहेत. 'मी शिवसैनिक गिरीष चव्हाण, बाळासाहेब ठाकरे समर्थक', या 'X' ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. तसेच याच व्हिडिओला कॅप्शन दिलं गेलं आहे.

हे ही वाचा : बीड : रीलस्टार असलेल्या ऊसतोड मजुरावर ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळली, फेसबुक लाईव्ह सुरु असातानाच काळाचा घाला

सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेसाठी प्रचारासाठी काही भाजप पक्षाच्या उत्तर प्रदेशातील गाड्या मुंबईकडे कूच करतानाचं चित्र दिसत आहे. या एकूण वाहनांपैकी UP 76 T 5504 अशा नंबर प्लेटचं वाहन दिसत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp