अहिल्यानगर: रात्री बाप-लेकात वाद अन् पहाटे एकाच दोरीने गळफास घेऊन संपवलं जीवन! भयानक घटनेनं जामखेड हादरलं...

मुंबई तक

जामखेड शहरातील नव्या कोर्ट परिसरातील शेतात बाप-लेकाने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. परिसरातील या धक्कादायक घटनेने गावकरी हादरून गेले आहेत.

ADVERTISEMENT

एकाच दोरीने गळफास घेऊन संपवलं जीवन!
एकाच दोरीने गळफास घेऊन संपवलं जीवन!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री बाप-लेकात वाद अन् पहाटे गळफास घेऊन संपवलं जीवन!

point

धक्कादायक घटनेनं जामखेड हादरलं...

अहिल्यानगर (जामखेड): अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नव्या कोर्ट परिसरातील शेतात बाप-लेकाने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. परिसरातील या धक्कादायक घटनेने गावकरी हादरून गेले आहेत. कानिफ ज्ञानदेव पवार (45) आणि सचित कानिफ पवार (16) अशी मृतांची नावे समोर आली आहेत. 

कौटुंबिक कारणावरून बाप-लेकात वाद 

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथे मृत कानिफनाथ पवार आपल्या कुटुंबासोबत राहत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली होती आणि शुक्रवारी (2 जानेवारी) कौटुंबिक कारणावरून कानिफ यांचा सचिनसोबत मोठा वाद झाला. सचित रात्री घराबाहेर निघून गेला. यानंतर कानिफ यांनी रात्री मुलाचा आजूबाजूला शोध घेतला मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. 

हे ही वाचा: 30 पानी सुसाईड नोट अन् अंगावर लिहिलं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव; पुण्यातील 56 वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन...

एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या 

पहाटेच्या सुमारास वडिलांनी पुन्हा आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी, झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सचित आढळला. नवीन कोर्ट रोड म्हाडा कॉलनीजवळील शेतात झाडाला सचितने मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे दृश्य पाहून कानिफ यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच कापडाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. 

हे ही वाचा: व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक! नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटनेची माहिती मिळताच, नगरसेवक महेश निमोणकर आणि संतोष गव्हाळे घटनास्थळी पोहोचले तसेच, उपनिरीक्षक शिवाजी कदम आणि सचिन देवडे सुद्धा तिथे दाखल झाले. तसेच, यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उमासे यांनी दोघांना मृत घोषित केलं. आता, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp