व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ... 82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक! नेमकं प्रकरण काय?
एका 82 वर्षीय वृद्धाला जाळ्यात अडकवून त्याच्यासोबत भयंकर घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
व्हिडीओ कॉल, धमकी अन् अश्लील व्हिडीओ...
82 वर्षीय वृद्धासोबत घडलं भयानक!
नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
Cyber Crime: गुजरातच्या अहमदाबाद येथून सायबर क्राइमचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सायबर भामट्यांनी घाबरवून आणि धमक्या देऊन त्याच्याकडून तब्बल 7.12 कोटी रुपये उकळल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रांचने 12 आरोपींना अटक केली असून त्यांचं इंटरनॅशनल सायबर गँगशी संबंध असल्याची माहिती आहे. कंबोडियातील चिनी गुन्हेगारांनी या सायबर नेटवर्कचं नेतृत्व केलं होतं.
सेलिब्रिटींना अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा दावा
4 डिसेंबरपासून या सायबर फसवणूकीला सुरूवात झाली. त्यावेळी, पीडित वृद्धाला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ट्राय (TRI) अधिकारी असल्याची ओळख करून दिली आणि पीडित वृद्धाच्या आधार कार्डचा वापर करून सेलिब्रिटींना अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला असून त्याच्याविरुद्ध मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोपीने दावा केला. त्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल केले.
तसेच, संबंधित वद्धाला घाबरवण्यासाठी आरोपींनी 2 कोटी रुपयांच्या ट्रान्झेक्शनचे बनावट पुरावे दाखवले आणि पीडित व्यक्तीचं नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात नरेश गोयलशी जोडलं गेल्याचं सांगितलं. त्यानंतर, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याला एक बनावट न्यायालय दाखवण्यात आलं. तसेच, त्या वृद्ध माणसाला 24 तास कॉलवर राहण्यास आणि डिजिटल अरेस्ट करण्याबाबत सांगण्यात आलं.
हे ही वाचा: 30 पानी सुसाईड नोट अन् अंगावर लिहिलं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव; पुण्यातील 56 वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन...
तुरुंगवास आणि मारहाणीची धमकी
यासोबतच, आरोपींनी पीडित व्यक्तीला बनावट लेटर आणि वॉरंट पाठवून सीबीआय, आरबीआय, ईडी आणि इंटरपोलच्या LOGO चा वापर केला आणि तुरुंगवास तसेच मारहाणीची धमकी दिली. त्यानंतर, 16 ते 26 डिसेंबर दरम्यान त्यांनी पीडित वृद्धाकडून त्याच्या बँक खात्याची आणि संपत्तीची माहिती मिळवली. तसेच, व्हेरिफिकेशन नंतर पीडित तरुणाला त्याचे पैसे परत पाठवले जातील, असं आरोपींनी आश्वासन दिलं. याच खोट्या आश्वसनाच्या आधारे आरटीजीएस आणि चेकच्या माध्यमातून वृद्धाने 7.12 कोटी सायबर भामट्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले.










