Sahil Khan : अभिनेता साहिल खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

A case has been registered against Bollywood actor Sahil Khan in Mumbai
A case has been registered against Bollywood actor Sahil Khan in Mumbai
social share
google news

मुंबई : बॉलिवूड अभिनेता साहिल खानविरोधात (Sahil Khan) मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेबाबत त्याने सोशल मीडियावर अश्लील कमेंट केल्याचा आरोप आहे. महिलेचा अक्षेपार्ह फोटोही सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. इतकचं नाही तर, महिलेने विरोध केल्यानंतर साहिल खान याने संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असाही आरोप आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी मुंबईच्या ओशिविरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against Bollywood actor Sahil Khan in Mumbai)

ADVERTISEMENT

याआधीही साहिल खानवर पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये, साहिल खानवर मॉडेल आणि फिटनेस ट्रेनर मनोज पाटील यांचा छळ केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय 2014 मध्ये साहिल खानवर बॉलीवूड अभिनेत्री सना खानचा मित्र इस्माईल खानसोबत जिममध्ये मारामारी केल्याचाही आरोप आहे.

हे वाचलं का?

6 नायजेरियन तरूणांनी 700 भारतीय महिलांना नादी लावलं, अन्…

जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील एका जोडप्याशी संबंधित वादातून साहिल खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये साहिल खानवर फसवणूक, कट रचणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर सोनिया अहमद (30) आणि करणकुमार धीर (34), यांनी ओशिवरा येथील त्याच्या दुकानातून 52,000 रुपयांचे प्रोटीन सप्लिमेंट्स विकत घेतले, परंतु पेमेंट केले नााही. इतकेच नाही तर या जोडप्याने त्याचे फोटोशॉप केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते, असा आरोप साहिल खानने केला होता.

ADVERTISEMENT

अभिनेता व्हायचं होतं, मुंबईला येणार होता पण…; प्रकरण कळल्यावर पोलीस हादरले

साहिल खान आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. स्टाइल, एक्सक्यूज मी, अलादीन आणि रामा: द सेव्हिअर हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. सध्या साहिल खान बराच काळ अभिनय जगतापासून दूर असून त्याचा व्यवसाय सांभाळत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT