6 नायजेरियन तरूणांनी 700 भारतीय महिलांना नादी लावलं, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nigerian gang arrested in noida
Nigerian gang arrested in noida
social share
google news

Nigerian gang arrested in noida :आजकाल डेटींग अॅपच्या माध्यमातून कोणालाही सहज डेट करता येते. अशाच डेटींग अ‍ॅपच सहारा घेऊन सहा नायजेरीयन (nigerians) तरूणांनी तब्बल 700 भारतीय महिलांना (Indian Women) प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून पैसै उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेत महिलांना आलिशान गिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांना गड्डा घातला जात होता. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळताच बदनामीच्या भीतीने अनेक महिला तक्रारीसाठी समोरच आल्या नाहीत. आता एका महिलेने हिंमत केली आणि तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांना आता या नायजेरीयन गॅंगच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.(noida police arrested 7 nigerians 8 includin indian women cheated with women and make it fraud)

असे ओढायचे जाळ्यात

नायजेरीयन (nigerians) गॅंग डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून भारतीय महिलांशी मैत्री करायचे. असे साधारण 2 महिने त्यांनी 700 भारतीय महिलांसोबत मैत्री केली होती.या सर्व महिलांना नेवी ऑफिसर असल्याचे भासवले होते. आरोपी गुगलवरून नेवी ऑफीसरचे फोटो डाऊनलोड करून स्वत:ची प्रोफाईल बनवायचे. तसेच आलिशान गिफ्ट आणि विदेशी युरो पाठवण्याचे महिलांना आमीष देखील द्यायचे. तसेच महिलांना या गोष्टीवर विश्वास बसावा यासाठी संबंधित गिफ्ट अथवा विदेशी युरोचे फोटो पाठवयाचे. अशाप्रकारचे जाळ टाकून आरोपी महिलेचा विश्वास संपादन करायचे.

कस्टम ऑफिसरच्या नावाने बनावट कॉल

महिला जाळ्यात फसल्याचे कळताच, काही दिवसांनी तिला कस्टम ऑफिसर बनून कॉल करायचे.या संभाषणात तिच्यासाठी आलेले आलिशान गिफ्ट आणि विदेशी य़ुरो पाठवण्यात आल्याचे तिला सांगितले जायचे. मात्र हे गिफ्ट तुम्हाला मिळण्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागणार असल्याची माहिती द्यायचे. अशाप्रकारे प्रत्येक महिलेकडून कस्टम ड्यूटीच्या नावाखाली 50 ते 60 हजार रूपये मागायचे. महिलेला जर तरीही फसवणूक झाल्याचे न कळाल्यास ती आरोपीच्या जाळ्यात फसायची आणि तिला गंडा घातला जायचा. दरम्यान आतापर्यंत नायजेरीयन (nigerians) गॅंगने अनेक महिलांना गंडा घातला आहे. मात्र बदनामीच्या भितीने अनेक महिला तक्रारीसाठी समोर येत नाही आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असा झाला घटनेचा उलगडा

खरं तर या प्रकरणात एका महिलेने हिम्मत करून पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता.या तपासात पोलिसांनी 6 नायजेरीयन तरूण, एक नायजेरीयन महिला आणि एक भारतीय महिलेला ताब्यात घेतले होते. या गॅंगकडून (nigerians) पोलिसांनी 3 लॅपटॉप, 31 स्मार्टफोन, 31 हजार रोकड ताब्यात घेतली.यासह 5 पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी आणि 1 बॅक पासबूक अशी आवश्यक कागदपत्रे देखील ताब्यात घेतली.

ADVERTISEMENT

दिल्लीच्या नोएडात ही घटना घडली आहे. य घटनेत पोलिसांनी 6 नायजेरीयन तरूण, एक नायजेरीयन महिला आणि एका भारतीय महिलेला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT