PM Modi : 'मोदीजी, कांद्यावर बोला', तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi rally nashik one youth slogan speak on onion nashik loksabha dindori hemant godase bharti pawar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे.
social share
google news

Pm Narendra Modi Nashik Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सूरू असताना अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने 'कांद्यावर बोला' अशी घोषणा दिली. या घोषणेनतंर काही सेकंद भाषण थांबलं आणि त्यानंतर सभेत घोषणा देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं. त्यामुळे मोदींच्या (Pm Narendra Modi) सभेत गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे.  (pm narendra modi rally nashik one youth slogan speak on onion nashik loksabha dindori hemant godase bharti pawar)

ADVERTISEMENT

नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरूवात केल्याच्या काही मिनिटानंतर अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. या घोषणेनंतर सभेत एकच गोंधळ उडाला होता. 

हे ही वाचा : "मी हिंदू-मुस्लीम करायला लागलो, तर...", स्वतःच्या भाषणावर मोदी काय बोलले?

 
तरूणाच्या या घोषणेनंतर मोदींनी काही सेकंद भाषण थांबवलं.त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारे करून तरूणाला खाली बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणेनंतर मोदींनी उत्तर देताना जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.

या सर्व घटनेनंतर सभास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ तरूणाला ताब्यात घेतले आहे. आणि त्याला सभा स्थळावरून बाहेर नेले आहे. तरूणाने घातलेल्या गोंधळामुळे सभा काही सेकंद थांबली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "एकनाथ शिंदे 7-8 तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते", फडणवीसांचा स्फोटक दावा

पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 

एका नेत्यानं छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये मर्ज करण्याचा सल्ला दिलाय, हे यांचे हाल आहे. नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणं निश्चित आहे. जेव्हा नकली शिवसेना काँग्रेसमध्ये जाईल तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेबांची येईल. बाळासाहेब म्हणायचे की जेव्हा मला वाटेल की शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी शिवसेना बंद करेल. हा विनाश बाळासाहेबांना सर्वाधिक दुखी करत असेल. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांचे विचार नष्ट केले, अशी टीका मोदींनी ठाकरेंवर केली.

राममंदिर व्हावं हा बाळासाहेबांचं स्वप्न, जम्मूमधून ३७० संपवणं हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाल्याची सर्वाधिक चीड नकली शिवसेनेला आलीय. राममंदिर प्राणप्रतिष्ठेला आमंत्रण देऊनही नाकारलं. शिवसेना आणि काँग्रेसची पापाची पार्टनरशीप, यांचं पाप उघड झालंय. सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसला डोक्यावर घेऊन नकली शिवसेना फिरतेय.  नकली शिवसेनेला शिक्षा देण्याची तयारी महाराष्ट्रानं केलीय, असा हल्लाबोलही मोदींना ठाकरेंवर केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT