बोटावरच्या भल्या मोठ्या ड्रेसिंगचे फोटो स्वत: रुपाली चाकणकरांनीच दाखवले मीडियाला, म्हणाल्या...

मुंबई तक

Rupali Chakankar vs Sushma Andhare: शिवसेना UBT नेत्या सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांचे फोटो दाखवून जे गंभीर आरोप केले होते त्या आरोपांना आता चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा त्या नेमकं काय म्हणाल्या.

ADVERTISEMENT

rupali chakankar herself showed photographs her dressing finger she send legal notices to those making false allegations direct rebuttal to accusations leveled by sushma andhare
Rupali Chakankar vs Sushma Andhare
social share
google news

मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन खरात) याच्या बलात्कार व लैंगिक शोषण प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी काल (20 मार्च) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत काही फोटो दाखवले होते. त्याच दिवशी रात्री उशिरा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या रूपाली निलेश चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'त्या' फोटोंबाबत रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

राजीनामा दिल्यानंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या,  “काही जणांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी आजच्या बातमीत दाखवलं. 2 सप्टेंबरचा फोटो आहे. खरं म्हणजे हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा आहे. यापुढची 1 तारीख खोडली आणि 2 सप्टेंबरचा असल्याचं दाखवलं. त्यादिवशी अमावस्या, पौर्णिमा आहे असं काही तरी दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर आहेत असे फोटो आहेत. ते २ सप्टेंबरचे नाहीत. तर 12 सप्टेंबरचे आहेत.”

हे ही वाचा>> रुपाली चाकणकरांनी राजीनाम्याचं कारण काय दिलंय माहितीए?, 'ते' पत्र जसंच्या तसं...

“2 सप्टेंबरला आम्ही अजितदादांच्या कार्यक्रमात होतो. या फोटोमध्ये माझ्या हाताला कुठेही जखम नाही. हा 3-4 सप्टेंबरचा फोटो आहे. त्यातही कुठेच हाताला जखम नाही. आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे त्यातही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता काय दिवस होता.. कोणता विधी होता माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा फोटो आहे त्यातही हाताला जखम नाही.”

“त्यामुळे कायद्याच्या चौकटीतून आम्ही या सगळ्यांना नोटीसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका-टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या पसरवणं. या सगळ्याबाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेन.” असं रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp