'अशोक खरातसोबत अनेक लोकांचे फोटो आहेत, पण केवळ...', चाकणकरांचं मोठं विधान.. नेमका रोख काय?

मुंबई तक

Rupali Chakankar statement: अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. पाहा त्या नेमक्या काय म्हणाल्या.

ADVERTISEMENT

many people photographs with ashok kharat yet i was singled out as a soft target simply because i am a woman rupali chakankar makes big statement
रुपाली चाकणकर
social share
google news

मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात खरात यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव आला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार चाकणकर यांनी आज (20 मार्च) राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खरातसोबतचे फोटो-व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे असल्याचे स्पष्ट केले आणि केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या दोन दिवसांपासून करत आहात ते अत्यंत चुकीचं आहे, असा आरोप केला. यामुळे राजकीय वर्तुळात त्यांचा ‘रोख’ नेमका कोणाकडे आहे, याची आता चर्चा रंगली आहे. 

चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले,“अशोक खरात आणि आमचे जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो यामध्ये आहेत. पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या दोन दिवसांपासून करत आहात ते अत्यंत चुकीचं आहे.”

पाहा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर कॅमेऱ्यासमोर येऊन नेमकं काय-काय म्हणाल्या...

'शिवनिका या संस्थान हे महादेवाच्या मंदिराचं जे ट्रस्ट आहे त्यात मी सदस्य म्हणून काम केलं आहे. माझ्यासमवेत अनेक प्रतिष्ठित नागरिक या ट्रस्टवर होते. जेव्हा मी ट्रस्टवर होते तेव्हा मी आयोगाची अध्यक्षा झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे. खरं तर समाजात आपण कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. काही वेळेला तिथे होत असलेला कार्यक्रम.. मग तो शिवरात्रीचा असेल,गुरुपौर्णिमेचा असेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल.. या निमित्ताने आम्ही उपस्थित राहत होतो.'

हे ही वाचा>> अशोक खरातच्या लैंगिक संबंधाच्या 58 Video Clips, 'ही' Inside Story तुम्हालाही टाकेल हादरवून

'यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलंय. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली तशी मी आणि माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, वैयक्तिक वागणूक याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते.' 

'आज आपण ज्यांच्या बरोबर आहोत ते पुढे जाऊन कसं वागणार ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला.. मी लगेच ते ट्वीट देखील केले सुरुवातीला.'

हे वाचलं का?

    follow whatsapp