मुंबईत PM मोदींचा रोड शो; मेट्रोसेवा किती वेळ राहणार बंद?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोदींचा कुठे आहे 'रोड शो'?

point

रोड-शोच्या माध्यमातून भाजपकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात येणार

point

सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा मोदींचा रोड-शो असणार आहे.

PM Modi Ghatkopar Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) मुंबईतील घाटकोपरमध्ये (Ghatkopar) रोड-शो (Road Show) होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसंच मुंबईल पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.  या रोड-शोच्या माध्यमातून भाजपकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचवेळी सायंकाळी सहा वाजल्यापासून मेट्रोसेवाही बंद ठेवण्यात येणार आहेत. (PM Narendra Modi road show in Mumbai Ghatkopar How long will metro services be closed

ADVERTISEMENT

लोकांची सुरक्षा पाहता जागृती नगर ते घाटकोपर मेट्रो स्थानकादरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.  या रोड-शोच्या माध्यमातून भाजपकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांनी मेट्रोने प्रवास करताना या बदलाकडे लक्ष ठेवून आपला प्रवास करावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा मोदींचा रोड-शो असणार आहे. जवळपास अडीच किमीचा हा रोड-शो असेल. 

हेही वाचा : 'मोदीजी, कांद्यावर बोला', तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं?

मोदींचा कुठे आहे 'रोड शो'?

पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होत आहे. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असणार आहेत. मुंबईत मोदींचा रोड शो असणार आहे. 

हे वाचलं का?

घाटकोपरमधील एलबीएस रोडवर हा रोड शो असणार असून, अशोक सिल्क मिल ते पार्श्वनाथ चौकापर्यंत असणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : बलात्काराचा आरोप, 23 FIR; भिंडेची गुन्ह्याची भलीमोठी कुंडली

एलबीएस मार्गावरील गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन, माहुल-घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी. कदम जंक्शन, उत्तर व दक्षिण मार्गावरील वाहतूक दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण बंद असणार आहे. 

ADVERTISEMENT

या काळात पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबुर लिंक रोड, शीव-वांद्रे लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT