जालना : लग्नाच्या आमिषाने बलात्कार, तरुणी चार महिन्यांची गर्भवती; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने बघा काय केले?

मुंबई तक

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ADVERTISEMENT

Jalna Crime News
Jalna Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जालना : लग्नाच्या आमिषाने बलात्कार

point

तरुणी चार महिन्यांची गर्भवती

point

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने बघा काय केले?

Jalna Crime News, गौरव साळी : जालना जिल्ह्यात विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले, त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : धाराशिव : टायर फुटून कार चहाच्या स्टॉलवर घुसली; माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केले

पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला अटक केली. मात्र, तपासादरम्यान एक धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपीने कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शिक्षा कमी करून घेण्याच्या उद्देशाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचे बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करून आपले वय केवळ 16 वर्षे 6 महिने असल्याचे भासवले, जेणेकरून त्याला अल्पवयीन घोषित केले जावे.

'असे' समोर आले खरे वय

पोलिसांना आरोपीने सादर केलेल्या कागदपत्रांवर संशय आल्याने त्यांनी या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. या चौकशीत आरोपीचे खरे वय 18 वर्षे 6 महिने असल्याचे उघड झाले आणि त्याचा बनावट कागदपत्रांचा डाव फसला. बदनापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय अजय जयस्वाल यांनी सांगितले की, आरोपीने बनावट दस्तऐवज सादर करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी तांत्रिक तपासणीद्वारे त्याचे खरे वय समोर आणले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp