धाराशिव : टायर फुटून कार चहाच्या स्टॉलवर घुसली; माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

मुंबई तक

Dharashiv Accident : मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील एक नव दाम्पत्य तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन हैदराबादकडे परत जात होते. सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा चौकाजवळील भारत टायर दुकानासमोर मारुती सुझुकी कार (क्रमांक टीएस 34 एफ 4706 / ) भरधाव वेगाने जात असताना अचानक उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसली.

ADVERTISEMENT

Dharashiv Accident
Dharashiv Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : टायर फुटून कार चहाच्या स्टॉलवर घुसली

point

माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

Dharashiv Accident,  गणेश जाधव : सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चहाच्या स्टॉलवर बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी उमरगा शहराजवळील जकेकूर चौक (चौस्ता परिसर) येथे घडली. या घटनेमुळे उमरगा शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

माजीनगरसेवकासह आणखी एकाचा मृत्यू 

मृतांमध्ये उमरगा येथील माजी नगरसेवक बळीराम कृष्णा पवार (वय 48) आणि व्यावसायिक तथा जनता अर्थमूवर्सचे मालक लाडनशा गुलाबशा मुर्शीद (वय 52) यांचा समावेश आहे. तर मेकॅनिक सचिन भिमाशंकर कुटार (30) व टपरीचालक महादेव देढे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 'तुझ्या पतीला मारुन टाकलं, मृतदेह पुलाखाली आहे', हत्येनंतर प्रियकराने दिली अपडेट; पत्नीनेच थंड डोक्याने कट रचला

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील एक नव दाम्पत्य तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन हैदराबादकडे परत जात होते. सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा चौकाजवळील भारत टायर दुकानासमोर मारुती सुझुकी कार (क्रमांक टीएस 34 एफ 4706 / ) भरधाव वेगाने जात असताना अचानक उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसली.

हे वाचलं का?

    follow whatsapp