Mumbai Hoarding Collapse : बलात्काराचा आरोप, 23 FIR; भिंडेची गुन्ह्याची भलीमोठी कुंडली

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ghatkoper hoarding case rape case against bhavesh bhinde 23 case file in police station contest election
होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) त्यांच्या कुटुंबासह फरार झाला आहे.
social share
google news

Ghatkoper Hoarding Case, Bhavesh Bhinde: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेनंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी आणि होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) त्यांच्या कुटुंबासह फरार झाला आहे. पोलीस सध्या त्याचा मागावर आहेत. या दरम्यान भावेश भिंडेची गुन्हेगारीची पार्श्वभूमी समोर आली आहे. त्यानुसार भावेश भिंडेवर यापु्र्वी 23 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर बलात्काराचाही (Rape Case) गुन्ह्याची नोंद आहे.  (ghatkoper hoarding case rape case against bhavesh bhinde 23 case file in police station contest election) 

घाटकोपरमधील पंतनगर पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना सोमवारी घडली होती.या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर 88 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी इगो मिडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे विरोधात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण अद्याप भावेश भिंडेची अटक होऊ शकलेली नाही. कारण या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे कुटुंबासह फरार झाला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे. 

हे ही वाचा : "मी हिंदू-मुस्लीम करायला लागलो, तर...", स्वतःच्या भाषणावर मोदी काय बोलले?

2009  मध्ये लढवली होती निवडणूक

भावेश भिंडेवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तसेच भावेश भिंडेने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. या प्रतिज्ञापत्रात त्याने त्याच्यावर 23 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. ही सर्व प्रकरणे चेक बाऊन्ससाठी मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत होती. भावेश भिंडेवर बेकायदेशीरपणे वृक्षतोडीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान भावेश भिंडे सुरुवातीला गुजू अॅडस नावाची कंपनी चालवत होता. मात्र या कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर महपालिकेने त्याला काळ्या यादीत टाकले होते. त्यानंतर भिंडेने इगो मिडीयाच्या नावाने नवीन कंपनी स्थापन केली होती.त्यानंतर त्याने या कंपनीच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट मिळवायला सुरूवात केली होती. तसेच भावेशने गेल्या काही वर्षात होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी अनेक रेल्वे आणि बीएमसी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले होते. या दरम्यान त्याने महापालिका आणि रेल्वेच्या नियमांचे उल्लघन केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : "एकनाथ शिंदे 7-8 तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते", फडणवीसांचा स्फोटक दावा

झाडांवर विषप्रयोग 

विशेष म्हणजे पालिकेच्या धोरणांमध्ये  40 बाय 40 म्हणजेच 1 हजार 600 चौरस फुट होर्डिंग उभारण्याची परवानगी आहे. पण जाहिरातदार कंपनीने 120 बाय 120 म्हणजेच 14,400 चौरस फुटाचे होर्डींग उभारले होते. तसेच हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आला होता. काही झाडे तोडण्यात आली होती. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. मात्र तरीही कंपनीने होर्डिंग उभारलं होतं. 

ADVERTISEMENT

दरम्यान अद्याप तरी या घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक झाली नाही आहे. मात्र या घटनेने मुंबईचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT