Uddhav Thackeray : 'नवरदेव बनवून किती दिवस बोहल्यावर चढणार...', ठाकरेंनी PM मोदींना डिवचलं
Uddhav Thackeray Criticize Pm Narendra Modi : ठाकरेंनी यावेळी जिरेटोपच्या वादावरून प्रफुल पटेलांवर हल्ला चढवला. नकली संतान मांडीवर घेतलं तर ते वाह्यात निघालं.., प्रफुल पटेल. काल जिरेटोप आज गांधी टोपी, रोज टोप्या बदलणारा माणूस देशाचा पंतप्रधान पाहिजे का तुम्हाला, असा टोला देखील ठाकरेंनी मोदींना लगावला.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Criticize Pm Narendra Modi : तुम्ही किती दिवस नवरदेव बनवून बोहल्यावर चढणार आहात. प्रत्येक वेळा निवडणूक आल्या की मोदी मुंडावल्या लावून तयार मीच तिकडे पाटावर चढणार, अशा शब्दात शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Pm Narendra Modi) खिल्ली उडवली आहे. इतकंच नाही तर ठाकरेंनी अनेक मुद्यावर मोदींना घेरण्याचाही प्रयत्न केला आहे. (udhhav thackeray criticize narendra modi on nashik rally rajabhau vaze mahavikas aghadi nashik loksabha 2024)
ADVERTISEMENT
नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. तेलंगणाच्या भाषणात हे मला नकली संतान म्हणाले, मोदीजी मी माझं बर्थ सर्टीफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि ती मागायची तुमची लायकी पण नाही आहे. तुम्ही ब्रम्हदेवाचा बाप नाहीत, अशा शब्दात ठाकरेंनी नकली संतानवरून मोदींवर टीका केली आहे. तसेच भाजपला राजकारणात पोरच होत नाहीत म्हणून त्यांना नकली संतान हे गद्दार मांडीवर घ्यावे लागतात. 70 हजार कोटींचा उप मुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : 'मोदीजी, कांद्यावर बोला', तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं?
ठाकरेंनी यावेळी जिरेटोपच्या वादावरून प्रफुल पटेलांवर हल्ला चढवला. नकली संतान मांडीवर घेतलं तर ते वाह्यात निघालं.., प्रफुल पटेल. काल जिरेटोप आज गांधी टोपी, रोज टोप्या बदलणारा माणूस देशाचा पंतप्रधान पाहिजे का तुम्हाला, असा टोला देखील ठाकरेंनी मोदींना लगावला. तसेच पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांची जिरेटोप घालू नका, जरी तुम्ही प्रफुट पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल, असा चिमटा देखील ठाकरेंनी पटेलांना काढला आहे.
हे वाचलं का?
ठाकरे पुढे म्हणाले, मोदींनी मी जाहीर आव्हानच देतो, मोदी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या. मी माझ्या सात पिढ्यांची वंशावळ घेऊन येतो.माझे वडील कोण?, माझे आजोबा कोण? आजोबांचे वडील कोण? त्यांचे वडील कोण? त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केलं आहे? मी काय करतोय? माझा मुलगा काय करतोय? मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ आणा आणि खरं काय ते दाखवा. नकली डिग्रीसारखी नकली वंशावळ घेऊ येऊ नका,असा टोला देखील ठाकरेंनी मोदींना लगावला.
हे ही वाचा : भाजपला 400 जागा का हव्यात आहेत?, भाजप नेते म्हणतात...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT