Lok Sabha Election 2024: भाजपला 400 जागा का हव्यात आहेत?, भाजप नेते म्हणतात...
Lok Sabha Election 2024 BJP: भाजपने यंदाच्या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे. पण एवढ्या जागा त्यांना कशासाठी हव्या आहेत याबाबत त्यांच्या नेत्यांनी काय म्हटलंय हे आपण पाहूयात.
ADVERTISEMENT

BJP 400 Seats: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मधील चार टप्प्यातील मतदान हे पूर्ण झालं असून देशात आता फक्त तीन टप्पे बाकी आहेत. अशावेळी राजकीय पक्षांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याच्या मोहिमेला भाजप नेत्यांनी वेग दिला आहे. तथापि, या आकड्यामागील कारणाबद्दल मात्र भिन्न मतं असल्याचं दिसून येतंय. (lok sabha election 2024 why bjp wants 400 seats these are the reasons)
काशी आणि मथुरेच्या भव्य मंदिरांसाठी हव्यात 400 जागा...
मंगळवारी हिमंता बिस्वा सरमा यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्यासाठी लक्ष्मी नगर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. तेव्हा ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत भाजप जेव्हा 400 चा आकडा पार करेल, तेव्हा मथुरेत कृष्णाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर बांधले जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल.'
समान नागरी संहितेसाठी...
यापूर्वी 11 मे रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांच्या समर्थनार्थ बिहारच्या बेगुसराय येथे रॅली काढली होती तेव्हा ते म्हणालेले की, संपूर्ण देशात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याची आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थानी अत्याधुनिक मंदिर बांधण्यासाठी एनडीएला लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकाव्या लागतील.
बाबरी मशिदीची पुनर्बांधणी होऊ नये यासाठी...
9 मे रोजी आसामचे हिमंता बिस्वा सरमा यांनी मलकानगिरी, ओडिशात एका सभेला संबोधित केले आणि म्हणाले, भाजप 400 जागांची मागणी करत आहे कारण काँग्रेस अयोध्येत राम मंदिराच्या जागी बाबरी मशिदीची पुनर्बांधणी करू शकते. पण बाबरी मशीद भारतात कधीही पुन्हा बांधली जाणार नाही याची मतदारांनी खात्री केली पाहिजे. त्यामुळे आम्हाला, पंतप्रधान मोदींना 400 हून अधिक जागा देऊन त्यांना पंतप्रधान करावे लागेल.