Lok Sabha Election 2024: 'महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीए..', ठाकरेंची मोदींवर जहरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

ठाकरेंची मोदींवर जहरी टीका
ठाकरेंची मोदींवर जहरी टीका
social share
google news

Uddhav Thackeray: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी काल (14 मे) उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रफुल पटेल यांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. पण याच मुद्द्यावरून आता शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जहरी टीका केलीए. (shiv sena ubt udhhav thackeray venomous criticism narendra modi over shivaji maharaj jiretop)

ADVERTISEMENT

'तुम्ही ज्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीए.. अजिबात लायकीचं नाहीए..' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील त्यांच्या जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली. 

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले.. 

'कर्नाटकामध्ये तो रेवण्णा.. बलात्कार करणारा माणूस.. महिलांवर अत्याचार करणारा माणूस आणि मोदी सांगतायेत या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत.. ही माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे.' 

हे वाचलं का?

'प्रफुल पटेल आज बोलले की, महाराजांचा अपमान करण्याची आमची तशी काय हे नव्हती.. पण यापुढे दक्षता घेऊ.. पण तुम्हाला कळलंय की, तुम्ही ज्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीए.. अजिबात लायकीचं नाहीए..' 

'शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा सक्त आदेश देणारे महाराज कुठे आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकवून ठेवणाऱ्यांचे नतद्रष्ट सरकार कुठे?' 

'तुमच्या भरोश्यावर मी या हुकूमशाहाच्या समोर उभा राहिलेलो आहे. मी त्यांना आव्हान देतोय की, आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावर आणलेलं आहे. या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो कोणी अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही. ही आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलो आहोत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT