मुंबई Tak चावडी: 'पियुष गोयल म्हणाले गिरण्यांच्या जागा विकायच्यात...', अरविंद सावंतांचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

arvind sawant big revealation piyush goyal girani mill sites sell mumbai tak chavadi lok sabha election 2024
10 वर्षात तुम्ही विकतही नाही आणि त्यांचा विकासही करत नाही
social share
google news

Arvind Sawant, Mumbai Tak Chavadi : दक्षिण मुंबईचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आज मुंबई Tak चावडीवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने अनेक मुद्यावर दिलखुलास उत्तरे दिली. इतकंच नाही तर अरविंद सावंत यांनी काही गौप्यस्फोट देखील केले आहेत. ''मुंबईतील गिरण्यांच्या जागा पियुष गोयलांना विकायच्या होत्या,असा मोठा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट अरविंद सावंत यांनी चावडीवर केला आहे.  (arvind sawant big revealation piyush goyal girani mill sites sell mumbai tak chavadi lok sabha election 2024)

मुंबई Tak चावडीवर अरविंद सावंत म्हणाले की, ''मुंबईतील गिरण्यांच्या जमीनीवरून मी सतत प्रश्न विचारायचो. गिरण्यांच्या शेजारी ज्या इमारती आहेत त्याचा पुर्नविकास करायचा आहे, कारण त्या इमारती पडायल्या आल्या आहेत, असे मी पियुष गोयल यांना नेहमी सांगायचो.यावर पियुष गोयल म्हणायचे, अरविंदजी विकायच्यात त्या मला, कशाला त्रास देताय, पण मी म्हणायचो विकायचंय तर व विकून तरी टाका. 10 वर्षात तुम्ही विकतही नाही आणि त्यांचा विकासही करत नाही, असा गौप्यस्फोट अरविंद सावंत यांनी केला.

हे ही वाचा : '...तेव्हा नकली शिवसेना तोंडावर कुलूप लावते', PM मोदी ठाकरेंवर बरसले!

उद्धवजींनी कपटनीती ओळखली...

अरविंद सावंत भाजपवर टीका करताना म्हणाले की,  आमची माणसं मनापासून काम करतात. पण तुमची माणसे धोरण ठेवून काम करतात. याला पाडाचंय, त्याला पाडायचंय. म्हणून त्यांनी ठरवलं 2014 साली उद्धव ठाकरे थोडे मवाळ वाटतायत. पण त्यांना कळलं नाही शिवसेनेची पाळेमुळे किती घट्ट् रूजलेली आहेत. त्य़ा काळात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पुर्णपणे नेस्तनाबूत झाली होती. 44 वर आली होती. काँग्रेसला विरोक्षी पक्ष नेतेपदही मिळालं नव्हत, मग मोदीजींनी विधानसभा निवडणुकीत 27 सभा महाराष्ट्रात कशासाठी घेतल्या ? कुणाला पाडायचं होतं, काँग्रेस तर संपली होती. ही कपटनीती ओळखणारे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी ते बरोबर ओळखलं म्हणून त्यांना आता झोंबतेय, अशी टीका सावंत यांनी भाजपवर केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'मोदीजी, कांद्यावर बोला', तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT