Amravati : थरकाप! अंगणात बसलेल्या कुटुंबालाच गाडीखाली चिरडले, जुन्या वादातून सैतानी कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

amaravati crime news a car driver killed whole family 3 dead and three are injured nachona gaon amaravati story
amaravati crime news a car driver killed whole family 3 dead and three are injured nachona gaon amaravati story
social share
google news

Amaravati News : धनंजय साबळे, अमरावती : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपीने कुटुंबियांच्या अंगावर चारचाकी चढवल्याची घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबातील सहा जणांना भीषण धडक बसली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना आता उपचारासाठी रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी (Police) सुरु केला आहे. (amaravati crime news a car driver killed whole family 3 dead and three are injured nachona gaon amravati story)

ADVERTISEMENT

दरियापूर तालुक्यातील नाचोना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीचे पीडीत कुटुंबियांशी जूना वाद होता. हाच वाद मनात धरून त्याने धक्कादायक कृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी दाऊ पिऊन त्याच्या चारचाकी गाडीसह पी़डीत कुटुंबियांच्या घरासमोर आला होता. यावेळेस पीडित कुटुंबियाच्या घरातील वृद्धमंडळी आणि काही सदस्य व्हरांड्यात बसले होते.

हे ही वाचा : Rohit Sharma IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? समोर आली मोठी अपडेट

या दरम्यान आरोपीने घरासमोर गाडी नेऊन कुटुंबियांवर चढवली होती. या घटनेत कुटुंबातील सहा सदस्यांना कारची भीषण धडक बसली. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून सहा जणांना दरियापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले होते. तर इतर तीन जखमींना अमरावती येथील इर्विन रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. सध्या या तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील चंदन नावाच्या दारुड्याने जुन्या वादातून दारू पिऊन ही घटना केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.त्यांनी घरासमोर बसलेल्या वृद्ध व त्यांच्या कुटुंबीयांच्या अंगावर अचानक चारचाकी चढवली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लगेचच आरोपी तेथून पळून गेल्याची माहिती आहे. या आरोपीचा आता शोध सूरू आहे.

हे ही वाचा : ‘मी शपथ घेतो तेव्हा ती पूर्ण करतोच.. दीड वर्षांपूर्वी…’, CM शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सूरू केला आहे. तसेच आरोपीचा देखील शोध सूरू आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT