Badlapur Case: 'अनैसर्गिक सेक्स आणि...', वासनांध अक्षय शिंदेबाबत दुसरी पत्नी काय म्हणाली?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

अक्षय शिंदेबाबत दुसऱ्या पत्नीचा गंभीर आरोप
अक्षय शिंदेबाबत दुसऱ्या पत्नीचा गंभीर आरोप
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीविरोदात नवा गुन्हा

point

आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या बायकोने दाखल केली तक्रार

point

आरोपी अनैसर्गिक शारिरीक संबंधांसाठी करायचा जबरदस्ती

बदलापूर: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अजूनही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. दोन चिमुरड्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात नराधम आरोपी अक्षय शिंदे तुरुंगात गेला आहे. त्याच्या पहिल्या पत्नीनं याआधीच काही धक्कादायक आणि हादरवून टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आता त्याची दुसरी पत्नी देखील समोर आली आहे. तिनं देखील अक्षयच्या संदर्भात धक्कादायक आरोप केले आहेत. शिवाय तिनं एक मोठं पाऊल देखील उचललं आहे. या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. (badlapur school case forcing for unnatural physical intercourse by akshay shinde the second wife also filed a case in the police)

हादरवून टाकणारी माहिती आली समोर...

बदलापूर प्रकरणातील तपासादरम्यान मिळेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने तीन वेळा लग्न केलं होतं. यातील पहिल्या दोन पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या. तर त्याच्यासोबत राहणारी तिसरी पत्नी ही गर्भवती आहे.

हे ही वाचा>>  Badlapur News: 'शिवाजी महाराजांनी आरोपीचे हात काढून घेतलेले', शरद पवारांचा प्रचंड संताप

बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी अक्षयचं पहिलं लग्न झाल्यानंतर त्याची ही पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेरी निघून गेली होती. अक्षय शारिरीक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा. त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखी होती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता पोलिसांनी अक्षय शिंदेविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे, बोईसर पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. नंतर हे प्रकरण बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

हे ही वाचा>> 'आरोपी अक्षय शिंदे मुलींच्या टॉयलेटमध्ये...', बदलापूर प्रकरणाच्या सर्वात धक्कादायक रिपोर्टने खळबळ!

आरोपीशी लग्न झाले होते. आरोपी शिंदेने या महिलेला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने तिच्या कुटुंबीयांना आरोपीच्या वागणुकीची माहिती दिली आणि नंतर त्याला सोडून दिले. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  
  
अक्षयच्या या पहिल्या दोन्ही पत्नींच्या जबाबामुळं बदलापूर प्रकरणात पोलिसांना चौकशीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळू शकतो. या महिलांच्या साक्षीमुळे अक्षयसारख्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा मिळायला मदत होऊ शकते, असं बोललं जात आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT