Crime: धक्का लागला अन् बाप-लेकांनी कॉलनीतच 17 वर्षीय मुलावर केले सपासप वार!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Delhi Crime News Father and 2 Minor Sons murdered 17 years boy by stabbing knives
Delhi Crime News Father and 2 Minor Sons murdered 17 years boy by stabbing knives
social share
google news

Delhi Murder CCTV : दिल्लीत दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढत आहेत. छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून रक्तपात होणं सामान्य झालं आहे. नुकतंच एक भयावह प्रकरण द्वारका येथे घडलं आहे. डाबरी परिसरात बारावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याची वार करून हत्या करण्यात आली. आश्‍चर्याची बाब म्हणजे तरुणांच्या भांडणात वडीलही सामिल झाले. बाप-लेकांनी मिळून ही हत्या केली. (Delhi Crime News Father and 2 Minor Sons murdered 17 years boy by stabbing knives)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबरच्या संध्याकाळी डाबरी येथील रोहतास नगरमध्ये एका तरुणावर चाकूने वार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता जखमीचे नाव रुपक असल्याचे समजले.

वाचा : राज ठाकरेंच्या मुलीला सोशल मीडियावर कोण देतंय त्रास?, शर्मिला ठाकरे तर संतापल्याच!

किरोकोळ कारणावरून रक्ताचा पाडला सडा

रुपकला त्याच्या मित्रांनी DDU रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी रुपकला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. रुग्णालयात उपस्थित असलेल्या रुपकचा मित्र सौरव याने सांगितले की, ‘तो उत्तम नगर परिसरात राहतो.

हे वाचलं का?

संध्याकाळी तो त्याचे मित्र रुपक, अविनाश, शुभम, आदिल, शाहनवाज, ध्रुव, जाहिद आणि त्याचा भाऊ सागर यांच्यासोबत मोमोज खाण्यासाठी बिंदापूरला गेला होता. तिथून सर्वजण आपापल्या घरी येत होते. रोहतास नगर येथील गल्ली क्रमांक सातमध्ये समोरून एक अल्पवयीन मुलगा येत होता.’

वाचा : Sunil Kedar : काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला बँक घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा, प्रकरण काय?

‘रुपकचा धक्का त्या मुलाला लागला. अल्पवयीन मुलाने रूपकला चापट मारली आणि भांडण सुरू केले. मित्रांनी भांडण शांत केले. अल्पवयीन मुलाची आई तेथे आली आणि त्याला सोबत घेऊन गेली. त्यानंतर सर्व मित्र गल्ली क्रमांक 26 जवळ आले आणि बोलू लागले. यावेळी, अल्पवयीन मुलाने त्याच्या लहान भावासह तेथे पोहोचून रूपकला कोपऱ्यात नेले. तेवढ्यात त्या अल्पवयीन मुलांचे वडील तेथे आले. त्यांनी रुपकला चापट मारली. त्यानंतर तिघे बाप-लेकांनी मिळून रुपकवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत चाकूने सपासप वार केले.’

ADVERTISEMENT

कॉलनीतच चाकूने भोसकलं!

भाऊ सागरने रुपकला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अल्पवयीन मुलाने चाकू काढून रुपकवर हल्ला केला. त्यामुळे रूपक जमिनीवर कोसळला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि धमकी देऊन पळ काढला.

ADVERTISEMENT

वाचा : Viral Video: पनीरवरून लग्नात राडा, भर मंडपात रक्ताचा सडा…

घटनेनंतर सर्व मित्रांनी जखमी रुपकला DDU रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी दोन अल्पवयीन भावांना ताब्यात घेतले असू आरोपी बापाचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT