अजबच.. बॉयफ्रेंडच्या बापासोबत पळून गेली गर्लफ्रेंड, म्हणते कशी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

girlfriend absconded with boyfriend father uttar pradesh strange incident
girlfriend absconded with boyfriend father uttar pradesh strange incident
social share
google news

कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाची प्रेयसी (Girl Friend) ही त्याच्या वडिलांच्याच प्रेमात पडली आणि एके दिवशी संधी साधून दोघेही एकत्र घरातून पळून गेले. सुरुवातीला मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला. साधारण वर्षभरानंतर दोघांनाही दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तरुणीच्या जबानीच्या आधारेच कारवाई केली जाईल. (girlfriend absconded with boyfriend father uttar pradesh strange incident)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चकेरी भागात कमलेश हा आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैया येथे कामाच्या शोधात आला होता. कमलेशचा मुलगा हा घर बांधण्याचे काम करायचा. दरम्यान, त्याचे येथेच राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. कधी-कधी ही तरुणी त्याला भेटण्यासाठी त्या तरुणाच्या घरीही येत असे. पण कधीकधी प्रियकर घर नसल्यास या तरुणीचं बॉयफ्रेंडचे वडील म्हणजेच कमलेशशी बोलणे व्हायचे.

कुटुंबातील लोकांना अजिबात आली नाही शंका

हळूहळू मुलीचं प्रियकराचे वडील कमलेश याच्यावरच प्रेम जडलं. पण याबाबत तरुणीच्या प्रियकराला काहीच माहीत नव्हतं. मार्च 2022 मध्ये अचानक तरुणी ही कमलेशसोबत पळून गेली. यावेळी कमलेशचा मुलगा घरीच होता, त्यामुळे मुलीच्या घरच्यांना त्याच्यावर संशय आला नाही. मुलीच्या नातेवाईकांनी चाकेरी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पण अनेक महिन्यांनंतरही मुलगी कुठे गेली याचा कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> नवरा अचानक घरी आला, बायको 15 वर्षाच्या मुलासोबत होती ‘त्या’ अवस्थेत…

पोलिसांनी दोघांनाही दिल्लीतून घेतले ताब्यात

एसएचओ रत्नेश सिंह सांगतात की, पोलिसांना तपासात कळले की, तरुणीचं कमलेशच्या मुलाशी अफेअर होतं आणि त्याच्या घरी येत-जात देखील होती. त्यामुळे पोलिसांनी कमलेशच्या मुलाची चौकशी केली. त्यावेळी त्यानेच पोलिसांना सांगितले की, ‘माझे वडील माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेले आहेत.’ यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपास केला असता कमलेश हा तरुणीसोबत दिल्लीत राहत असल्याचं समजलं. तो एका कारखान्यात काम करत होता. यानंतर पोलिसांनी दिल्लीला जाऊन दोघांना ताब्यात घेतले.

मुलाला माहित होत वडिलांचं कृष्णकृत्य

कमलेशच्या मुलाला त्याच्या वडिलांच्या कृत्याबद्दल माहिती होती, पण समाजात आपली इभ्रत राहणार नाही म्हणून तो याबाबत कोणालाही काहीही बोलला नव्हता. पण पोलीस चौकशीत त्याला खरं काय ते सांगावंच लागलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sangli Crime: ज्ञानेश्वरी वाचत बसलेले डॉक्टर… सख्ख्या भावाने गळाच चिरला!

सध्या पोलिसांनी कमलेशला पोलीस ठाण्यातच ठेवलं आहे. तर मुलीची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. वैद्यकीय चाचणीनंतरच तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुलीच्या जबानीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल. एसएचओ रत्नेश सांगतात की, सध्या मुलगी कमलेशसोबतच राहायचं असल्याचं सातत्याने बोलत आहे. मुलगी आणि कमलेश दोघेही प्रौढ आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जबाबच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT