Maharashtra Cabinet: भाजपने मंत्रिमंडळातून 'या' 12 जणांचा पत्ता कापला?

मुंबई तक

Maharashtra Cabinet Ministers List: महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. पाहा नव्या मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

फडणवीस सरकारचा जम्बो मंत्रिमंडळ विस्तार

point

तीनही पक्षातील मिळून 12 दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही

point

पाहा कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही

नागपूर: महाराष्ट्रात नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (15 डिसेंबर) पार पडला. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी तुलनेने तरुण असं मंत्रिमंडळ पाहायला मिळालं. तर महायुतीमधील तीनही पक्षातील प्रमुखांनी आपल्या दिग्गज नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. दरम्यान, राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, नेमकं मंत्रिमंडळात कोण-कोण असावं हे भाजपनेच ठरवलं आहे. 

म्हणजेच, भाजपने ज्या नेत्यांना हिरवा झेंडा दाखवला त्यांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या काही दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देता आली नाही.

हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion LIVE: फडणवीसांचं जम्बो मंत्रिमंडळ, महायुतीच्या 39 मंत्र्यांनी घेतली शपथ

एक नजर टाकूया कोणत्या पक्षाने कोणाचा पत्ता कापला... 

भाजपने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट

  1. सुरेश खाडे
  2. विजयकुमार गावित
  3. रवींद्र चव्हाण
  4. सुधीर मुनगंटीवार

भाजपने चार दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. ज्यापैकी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव नसणं हे अनेकांसाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे. कारण सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील भाजपमधील बडं प्रस्थ मानलं जात होतं. मात्र, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान न देऊन फडणवीसांनी सूचक असा संदेशही दिला आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion : थाटात पार पडला शपथविधी सोहळा! कोणत्या विभागाला किती मंत्रिपदं?

दुसरीकडे फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. पण त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?