पोलिसांच्या श्वान ‘लिओ’ची कमाल, बेपत्ता मुलाचा काही तासातच घेतला शोध

ADVERTISEMENT

Leo of Powai Police Dog Squad locates missing boy within hours investigates based smell T-shirt
Leo of Powai Police Dog Squad locates missing boy within hours investigates based smell T-shirt
social share
google news

Mumbai Crime : कुत्रा पाळीव असो किंवा भटका त्याच्या इमानदारीची नेहमीच चर्चा होत असते. त्यातही जर लष्कर आणि पोलीस दलातील काही श्वान (Dog) पथकातील कुत्र्यांचीही अनेकदा वेगवेगळी चर्चा होत असते. पवई पोलीस (Pawai Police) दलातही असाच एक प्रसंग घडला आहे. काही दिवसापूर्वी मुंबईतील पवई येथून एक 6 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्या बालकाच्या पालकांनी त्याबाबत पोलिसात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

घरी परतलाच नाही

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील अशोकनगर भागातील 6 वर्षांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळायला गेला होता, मात्र तो परत घरी आलाच नव्हता. तो घरी आला नसल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा त्या परिसरात शोध घेतला. मात्र तो सापडलाच नाही. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.

हे ही वाचा >> ‘…म्हणून मामाने तर जुगाड केला’, बावनकुळेंचा नेमका रोख कोणाकडे?

खबऱ्यांचीही घेतली मदत

मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पवई पोलिसांनीही तपास कार्याला सुरुवात केली. झोपडपट्टीचा परिसर असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले नव्हते. त्यामुळे बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनीही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे आणि खबऱ्यांच्या मदतीने व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

श्वान लिओने केली कमाल

तांत्रिक अडचणींमुळे पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाला बोलवून त्यांनी त्या मुलाने वापरलेल्या टी-शर्टच्या वासाच्या आधारे मुलाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी स्निफर श्वान लिओला पहिल्यांदा मुलगा राहत असलेल्या त्याच्या घरात घेऊन गेले. काही वेळाने लिओ त्याच ठिकाणी पोहोचला जिथे तो मुलगा होता. पोलिसांनी नंतर आंबेडकर उद्यान अशोक टॉवर परिसरातून बालकाला ताब्यात घेतले आहे. आता पोलीस अपहरण करणाऱ्या आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Assembly Elections 2023 Exit Poll Live Updates: पाच राज्यात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये नेमका कौल कुणाला?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT