Viral Video : टोळक्याने भररस्त्यात काढली मुलीची छेड; लोकांची बघ्याची भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chhtrapati Sambhajinagar girl molestation viral video
Chhtrapati Sambhajinagar girl molestation viral video
social share
google news

छत्रपती संभाजी नगर : येथील एक संतापजनक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये काही गुंड भरदिवसा रस्त्यात एका मुलीला मारहाण करत तिच्याशी गैरवर्तन करत असल्याचं दिसून येत आहे. हे गुंड तिचा पाठलाग करत तिची छेड काढत, कपडे ओढत आणि तिचा व्हिडीओ बनवा असं म्हणतं असल्याचंही दिसून येत आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे आजूबाजूचे लोक त्या मुलीसोबत झालेला गैरवर्तन शांतपणे पाहत असल्याच दिसत आहे. (Chhtrapati Sambhajinagar girl molestation viral video)

ADVERTISEMENT

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 एप्रिलच्या दुपारची आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा : 11 बँका लुटणारा, 14 बायकांसोबत पूलमध्ये रासलीला करणारा ‘हा’ बाबा कोण?

बुरखा घातलेली एक मुलगी रस्त्याने जात आहे. 5-6 मुले वाईट हेतूने तिच्या मागे लागली. काही वेळातच काही मुलांनी मुलीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. आधी ते तिच्या बॅगला ओढतात, त्यानंतर मुलगी आरडाओरडा करायला सुरुवात करते. कशीतरी मुलगी या गुंडांच्या तावडीतून निसटून पुढे जाते. पण हे गुंड तिचा पाठलाग करु लागतात. थोडं पुढे गेल्यावर यातील एक मुलगा त्या मुलीची ओढणी ओढू लागतो. दुसरा त्याला थांबवतो. यादरम्यान एका मुलगा मागून येऊन मुलीचा हात फिरवून मोबाईल हिसकावून घेतो आणि पळून जातो. यावेळी गुंडांनी तिच्या धर्मावरुनही मुलीवर भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai: शेअर ब्रोकरने केली मुलीची हत्या, नंतर घेतला गळफास; बायकोवर…

इतर धर्मातील मुलासोबत फिरते म्हणून…?

या व्हिडीओबाबत ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार , संबंधित मुलगी आपल्या एका मित्रासोबत बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी आली होती. मात्र एका विशिष्ट समाजाची मुलगी इतर समाजाच्या मुलासोबत फिरत असल्याचे म्हणत, तरुणांचं टोळकं तिथं जमा झालं. यावेळी त्यांना पाहून मुलाने तिथून पळ काढला. मात्र मुलीला या गुंडांनी घेरलं आणि तिची छेड काढायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT