VIDEO : कपडे धुवायला टाकले…अन् अचानक झाला वॉशिंग मशिनचा स्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Washing Machine Burst viral Video
Washing Machine Burst viral Video
social share
google news

Washing Machine Burst viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमधील काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कपडे धुताना वॉशिंग मशीनचा स्फोट (Washing Machine Burst) झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही आहे.मात्र घटनेचा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकणार आहे.सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते. (man come out after washing clothes washing machine bursts shocking viral video)

ADVERTISEMENT

देशात आजकाल मोबाईल स्फोटाच्या, लग्नात फायर क्रॅरक स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यात आता वॉशिंग मशीन ब्लास्ट (Washing Machine Burst) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पाहून नागरीकांनी आता वॉशिंग मशीन वापरताना सावधगिरीने बाळगणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर

व्हिडिओत काय?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका रूममध्ये वॉशिंग मशीन (Washing Machine Burst) ठेवली आहे. या मशिनमध्ये कपडे धूवायला टाकले आहे.या दरम्यानच एक माणूस त्याचे स्वत:चे धुतलेले कपडे घेऊन जाताना दिसत आहे. हा माणूस त्या रुमबाहेर निघाल्याच्या काही सेकंदात मोठा ब्लास्ट झाला. वॉशिंग मशीनचा हा ब्लास्ट असतो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले जात असताना अचानक काचेचे झाकण उघडते आणि कपडे बाहेर पडून मोठा ब्लास्ट होतो. तसेच या ब्लास्टची भीषणता इतकी असेत की त्या रुमची संपूर्ण काचचं खाली पडते. तसेच वॉशिंग मशीनमधून आगीचे लोण बाहेर पड़तात. ही संपुर्ण घटना रुममध्येच बसवलेल्या कॅमेरात कैद होते. हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेत तो व्यक्ती सुदैवाने बचावतो. कारण तो रुममधून बाहेर पडताच हा अपघात घडतो. हा ब्लास्ट पाहून घरी वॉशिंग मशीन वापरणाऱ्या नागरीकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच आता वॉशिंग मशीन वापरताना त्यांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : तरुणीसोबत लॉजमध्ये गेला व्यापारी, नंतर रुममध्ये मृतदेहच मिळाला… नेमकं काय घडलं?

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून स्फोट होण्यामागची अनेक कारणे सांगितली आहेत. एका युझरने बॅटरी अभावी हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जर तो आणखीण काही सेकंद रूममध्ये राहिला असता, तर त्याला अजिबात दरवाजा उघडायची गरज पडली नसती, असे ट्विट दुसऱ्या युझरने केले आहे. तसेच अनेकांनी या व्हि़ड़िओवर देवाचे आभार मानले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT