कचऱ्यात पडलेलं पिस्तूल लहान मुलानं खेळणं समजून उचललं, ट्रिगर दाबताच धाडकन गोळी सुटली आणि...

मुंबई तक

दहिसर पूर्वेतील साईकृपा चाळीजवळ ही घटना घडली. लहान मुलगा तिथे खेळण्यासाठी गेला होता. तिथे त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक खरी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं सापडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील दहिसरमध्ये खळबळजनक घटना

point

लहान मुलाकडून चुकून फायर झाली गोळी

Mumbai : मुंबईच्या दहिसर पूर्वेतील साईकृपा चाळीजवळील मैदानात एक धक्कादायक घटना घडली. एका 12 वर्षीय मुलानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेली खरी पिस्तूल खेळणी समजून त्याचा ट्रिगर दाबला, ज्यामुळे गोळी झाडली गेली. सुदैवानं, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी तातडीने पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करून तपास सुरू केला आहे.

दहिसर पूर्वेतील साईकृपा चाळीजवळ ही घटना घडली. लहान मुलगा तिथे खेळण्यासाठी गेला होता. तिथे त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक खरी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं सापडली. मुलाने पिस्तूलला खेळणी समजून ट्रिगर दाबला आणि धाडकन गोळी झाडली सुटली. गोळीच्या आवाजानं आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं.

हे ही वाचा >>अस्थि विसर्जन करायला गेलेले दोघे समुद्रात बुडाले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पिस्तूल आणि काडतुसं ताब्यात घेतली. दहिसर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या पिस्तूलचा मालक कोण आहे आणि ते कचऱ्यात कसं आलं याचा शोध घेत आहेत. यासोबतच, ही पिस्तूल कोणत्या गुन्हेगारी कृत्याशी संबंधित आहे का, याचाही तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांशी चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा >>अस्थि विसर्जन करायला गेलेले दोघे समुद्रात बुडाले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं?​​​​​​

दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खरी शस्त्रे अशा प्रकारे सहजपणे सार्वजनिक ठिकाणी कशी सापडू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर या मुलाने किंवा अन्य कोणी याचा गैरवापर केला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp