एकाच वेळी दोन मुलींकडून ऑफर, तरूण हॉटेलमध्ये पोहचला अन् सुरू झाला घाणेरडा खेळ!

मुंबई तक

Crime News : तरुणीच्या वडिलांनी आणि तिच्या चुलत भावाने तरुणीच्या नंबरवरून मेसेज पाठवत फसवलं. त्यानंतर तरुणासोबत जे काही घडलं आहे. त्याने तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. याच प्रकरणात तरुणाचा तीन दिवस छळ करत मारहाण केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीच्या नंबरवरून मेसेज पाठवत केलं कांड

point

तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली

Crime News : राजस्थानातील बोडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीच्या वडिलांनी आणि तिच्या चुलत भावाने तरुणीच्या नंबरवरून मेसेज पाठवत फसवलं. त्यानंतर तरुणासोबत जे काही घडलं आहे. त्याने तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. याच प्रकरणात तरुणाचा तीन दिवस छळ करत मारहाण केली. ही घटना बाडमेरच्या शिवनगर भागातील आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बड्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग, लॉजवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल

पोलिसांनी कट रचणाऱ्या काका-पुतण्याला अटक केली, तर दुसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, 21 जूनच्या रात्री, एक 24 वर्षीय तरुण स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. त्याला त्याच्या तरुणीनेच मेसेज केला असल्याचा समज निर्माण झाला.  

मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलं? 

मेसेजमध्ये म्हटलं होतं की, आम्ही दोघी बहिणी आहोत. त्या तरुणाला शिवनगरमधील एका खोलीत बोलावण्यात आले होते. तो तरुण त्या मुलीच्या पूर्वीपासून परिचयाचा होता. त्यामुळे त्याने याबाबत फार काही संशय व्यक्त केला नाही. तेव्हा तो नंबरवर दिलेल्या पत्त्यावरून घरी पोहोचला होता. त्यावेळी त्या ठिकाणी त्याची मैत्रिण नसून तरुणीचे वडील, तिचा चुलत भाऊ आणि आणखी एक तरुण होता. 

या तिघांनी मिळून त्याला पकडले. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी क्रूर वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याला ओलीस ठेवत  मारहाण केली. त्यानंतर त्याला खोट्या लैंगिक शोषणात अडकवण्याचा प्रयत्न केला. ते ऐवढ्यावरच न थांबता त्याने तरुणाचे कपडे काढले आणि त्याचे नग्न फोटो आणि व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. अशातच आरोपींनी त्या तरुणाकडून एक दोन नाहीतर तब्बल 20 लाखांची खंडणी मागितली. 

आरोपींकडून पाच लाखांची मागणी

त्या तरुणीने आरोपीकडे विनंती केली आणि सांगितले की, त्याच्याकडे इतके पैसे नाहीत. त्यानंतर आरोपीने पाच लाखांची मागणी केली आहे. तरुणाने कसा बसा कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या कुटुंबाने 50 हजार रुपये देतो असे  सांगितले, पण आरोपी हे पाच लाख रुपयांवर ठाम होते. अखेर पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली. 

हेही वाचा : महिला किर्तनकाराच्या आश्रमात घुसून दगडाने ठेचून मारलं, कारण ऐकून बसेल धक्का

दरम्यान, 24 जून रोजी पोलिसांनी तरुणाचे ठिकाण शोधून त्याला शिवनगर येथून वाचवले, परंतु घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर बाडमेर पोलिसांनी पथके तयार केली आणि अखेर त्यांच्या गावातील काका-पुतण्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp