4 मुलांची आई असलेली रिता अनैतिक संबंधामुळे नको ते करून बसली, थेट पतीसोबत...

मुंबई तक

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

4 मुलांची आई असलेल्या महिलेने केली पतीची हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
4 मुलांची आई असलेल्या महिलेने केली पतीची हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

औरंगाबाद (बिहार):  एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून नंतर त्याचा मृतदेह छताला लटकवल्याची धक्कादायक घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. मदनपूर पोलीस स्टेशन परिसरातील नक्षलग्रस्त गाव आझाद बिघा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पत्नी रीता देवी हिला पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी, नजीकच्याच झिकाटिया गावात एका पुरूषाला त्याच्या पत्नी आणि प्रियकराने स्कॉर्पिओ गाडीने चिरडून ठार मारले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री रीता देवी हिने तिचा प्रियकर अरविंद भुईया याला बोलावून पती सुनेश्वर भुईया (वय 42 वर्ष) याला शेतात नेले. तिथे दोघांनीही प्रथम सुनेश्वरला काठीने मारहाण केली आणि नंतर गळा दाबून त्याची हत्या केली. हत्येनंतर, मृतदेह घरी आणण्यात आला आणि गळ्यात साडीचा फास बांधून छतावरून लटकवण्यात आला, जेणेकरून त्याने आत्महत्या केली असं भासविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

हे ही वाचा>> पुतण्यासोबत लग्न करणाऱ्या काकीचा खळबळजनक Video व्हायरल! लव्ह स्टोरीमध्ये आला नवा ट्विस्ट, काकानेही..

स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून, शुक्रवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पत्नी रीता देवी हिने तिच्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. तपासात असे दिसून आले की, रीता हिचे गेल्या अडीच वर्षांपासून अरविंदशी प्रेमसंबंध होते. तिच्या वाईट वर्तनामुळे तिचे तिच्या पतीशी अनेकदा वाद होत असत.

चार मुलांची आई आहे रीता...

रीता आमि अरविंद यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला दूर करण्यासाठी रीता हिने तिचा प्रियकर आणि तिचे मामा सुरेश भुईया यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. सध्या पोलीस अरविंद आणि सुरेश या दोघांचाही शोध घेत आहेत. रीता ही चार मुलांची आई आहे. तिला दोन मुले आणि दोन मुली आहेत. तिच्या एका मुलीचे नुकतेच लग्नही झाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp