पुतण्यासोबत लग्न करणाऱ्या काकीचा खळबळजनक Video व्हायरल! लव्ह स्टोरीमध्ये आला नवा ट्विस्ट, काकानेही..
Shocking Love Story Viral : बिहारमधील प्रेमप्रकरणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बिहारच्या जमुई येथील व्हायरल झालेली पुतण्या-काकीच्या लव्ह स्टोरीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीने उडवली खळबळ

नवा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Shocking Love Story Viral : बिहारमधील प्रेमप्रकरणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बिहारच्या जमुई येथील व्हायरल झालेली पुतण्या-काकीच्या लव्ह स्टोरीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियावर यूजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अशातच पुतण्या-काकीच्या प्रेमप्रकरणाचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
बिहारच्या जमुई येथील पोलीस ठाणे हद्दीतील सिकरिया गावातील विशाल कुमार दुबेचं लग्न पटनात राहणाऱ्या आयुषीसोबत 2021 मध्ये झालं होतं. विशालच्या घराजवळ त्याचा पुतण्या सचिन राहत होता. सचिन त्यांच्या घरी ये जा करायचा. त्याचदरम्यान त्याचे काकी आयुषीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले.
हे ही वाचा >> 'कांटा लगा' गाण्यावर अवघ्यांना थिरकवणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन, नेमका कसा झाला मृत्यू?
याबाबत काका विशालला कळलं, त्यानंतर पती-पत्नीमध्ये वादविवाद सुरु झाले. पण तोपर्यंत आयुषीने सचिनसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. हे प्रेकरण वाढत गेलं आणि थेट कोर्टापर्यंत पोहोचलं. पण याचदरम्यान सचिन आणि आयुषी गायब झाले. दोघेही अचानाक पाच दिवसानंतर गावात परतले. त्यानंतर विशालसमोरच आयुषीने सचिनसोबत लग्न केलं.
आता नवीन व्हिडीओ आला समोर
लग्नानंतर आयुषीने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ती आता तिचं आयुष्य सचिनसोबत जगणार आहे. विशालनेही आयुषीबाबत अनेक खुलासे केले होते. पण आता जे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आयुषी आणि सचिन एक रुममध्ये बेडवर असल्याचं दिसतं. आयुषी तिच्या हातात फोन घेत व्हिडीओ बनवते. त्याचदरम्यान सचिन फोनवर असल्याचं पाहायला मिळतं. दोघांमध्ये रोमॅन्टिक अदा रंगल्याचंही या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.