'कांटा लगा' गाण्यावर अवघ्यांना थिरकवणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन, नेमका कसा झाला मृत्यू?
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' ची स्पर्धक शेफाली जरीवालाचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. वयाच्या 42 व्या वर्षी शेफालीचं कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी

'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचं निधन

कशामुळे झालं शेफालीचं निधन?
Shefali Jariwala Death: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' ची स्पर्धक शेफाली जरीवालाचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. वयाच्या 42 व्या वर्षी शेफालीचं कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. शेफालीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर मनोरंजन विश्वातील कलाकरांना तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला. या दु:खद बातमीमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.
शेफालीचं निधन कशामुळे झालं?
रिपोर्ट्सनुसार, शेफालीला कार्डिएक अरेस्ट आला आणि त्यानंतर लगेच तीचा पती अभिनेता पराग त्यागीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, हॉस्पिटमध्ये पोहचताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स कधी येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री म्हणजेच 27 जून 2025 रोजी सुमारे 12:30 वाजता शेफालीचा मृतदेह अंधेरीमधील कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. कूपर रुग्णालयातील एएमओ (Assistant Medical Officer) यांनी सांगितल्याप्रमाणे, शेफालीचा मृतदेह दुसऱ्या हॉस्पिटलमधून तिथे आणण्यात आला होता. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आल्यानंतरच कळेल.
कूपर रुग्णालयात शेफाली जरीवालाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम सुरू आहे. दरम्यान, शेफालीचा पती पराग त्यागी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यावेळी अतिशय दु:खी अवस्थेत परागने हात जोडून मीडियाकडे अपील केलं.