Mumbai Crime: पायजम्याच्या नाडीने आवळला गळा, जुनं वैर अन्…
तिघा मित्रांचा जुना वाद अचानक उफाळून आला होता, हा वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात दोघांनी पायजमाच्या नाडीनेच तिसऱ्या मित्राची हत्या केली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दोघंही पसार झाले होते. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच काही तासातच या प्रकरणाचा तपास लावला आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime : पूर्व वैमनस्यातून हातगाडी चालकाचा पायजमाच्या नाडीने गळा आवळून हत्या (Murder) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक ( Two Person Arrested) केली आहे. रविवारी या घटनेची माहिती देताना पोलिसांनी या प्रकरणी आणखी काही माहिती उघड केली. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दक्षिण मुंबईतील (South Mumbai) धनजी रस्त्यावर एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास केला असता त्यांनी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT
गळा आवळून केली हत्या
दक्षिण मुंबईतील या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव विजय मंडल असल्याचे सांगितले. यावेळी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर विजय मंडल यांचा गळा आवळून हत्या केल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला.
हे ही वाचा >> लग्नाच्या मंडपात रक्ताचं शिंपण, मुलगा-सुनेच्या भांडण्यात.. व्याह्याची निर्घृण हत्या!
दोघांनी मिळून केली हत्या
त्यानंतर असं समजले की विजय मंडल यांची हत्या प्रदीप मंडल आणि सूरज प्रामाणिक यांनी गळा आवळून त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी प्रदीप मंडल आणि सूरज प्रामाणिक यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पूर्ववैमनस्यातून प्रदीप आणि सूरजने पायजम्याच्या नाडीने विजय मंडलचा गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले.
हे वाचलं का?
नेमका वादाचा होणार उलघडणार
पोलिसांनी आता या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचा शोध घेत आहेत. हातगाडी चालवणाऱ्याची इतक्या निर्घृणपणे का हत्या करण्यात आल्याचाही पोलीस तपास करत आहेत. या तिघांचा नेमका वाद का होता आणि ही हत्या करताना आणखी कोणाचा यामध्ये समावेश होता का याचाही पोलीस शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> साडीने गळा घोटतो! 5 महिन्यात केल्या 9 हत्या, हल्लेखोराच्या दहशतीत महिला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT