वॉन्टेड किलरला 31 वर्षानंतर ठोकल्या बेड्या, मुंबई पोलिसांनी असा रचला सापळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai wanted killer nabbed after 31 years neighbors say killer is dead Mumbai police
Mumbai wanted killer nabbed after 31 years neighbors say killer is dead Mumbai police
social share
google news

Crime News: तपास कार्यात आणि गुन्हेगारी विश्वात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police ) कार्यकर्तृत्वामुळे नेहमीच दबदबा निर्माण झालेला आहे. आताही अशीच एक घटना घडली आहे. 1989 मध्ये झालेल्या हत्येतील आरोपीचा शोध लावून मुंबई पोलिसांनी त्याला आता अटक (Arrested) केली आहे. पोलिसांनी सांगितले की, 62 वर्षाच्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतले असून त्याने 31 वर्षापूर्वी त्याला अटक करण्यात आली होती मात्र त्यावेळेपासून तो फरार होता. त्यानंतरही मुंबई पोलिसांनी त्याचा शोध चालूच ठेवला होता. 62 वर्षाच्या आरोपीला पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून अटक केली असून त्याचा शोध त्याच्या पत्नीच्या मोाबाईल नंबरमुळे लागल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

जामिनानंतरही फरार

मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या 62 वर्षाच्या दीपक भिसेवर हत्या केल्याचा आरोप आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. 1989 मध्ये पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले होते. मात्र त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र तो हजर झाला नव्हता. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्यावेळेपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. दीपक भिसेने राजू चिकना नावाच्या व्यक्तीचा खून केला होता.

हे ही वाचा >> Maval Lok Sabha : ‘महायुतीचा उमेदवार मीच’, जागावाटपा आधीच शिंदेंच्या खासदाराने केली घोषणा

आरोपीच्या मृत्यूच्या अफवा

दीपक भिसेला हत्येप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. मात्र त्यानंतर तो एकदाही न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे 2003 मध्ये त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तुळसकरवाडी, कांदिवलीमधील त्याच्या घरी जाऊन तपास केला होता. त्यावेळी स्थानिक लोकांनी भिसेचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली होती.

हे वाचलं का?

पत्नीच्या मोबाईलवरून शोध

हत्येप्रकरणातील आरोपीचा शोध घेतल्याची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भिसेच्या पत्नीचा मोबाईल नंबर पोलिसांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी नालासोपारामध्ये जाऊन तो राहत असलेल्या घरातून त्याला ताब्यात घेतले. भिसे हा कुटुंबासह त्याच भागात स्थायिक झाला होता. रोजचा खर्च चालवण्यासााठी आणि उदरनिर्वाहासाठी तो झाडे तोडण्याचे कंत्राट घेत होता. पोलिसांना त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर आरोपीचा शोध पोलिसांनी घेत त्याला अटक केली.

हे ही वाचा >> आई-वडिलांसह बहिणीची कुऱ्हाडीने हत्या, पोटच्या पोरानेच का घेतला जीव?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT