'तिथे टपकन सत्तेत बसले आणि इथे EVM वर..', पहिल्यांदाच 'असं' बोलले अमित शाह!
Amit Shah on EVM: महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर EVM बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पण आता त्याचबाबत अमित शाह यांनी पहिल्यांदाच विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आज तक'च्या अजेंडा आज तक 2024 या विशेष कार्यक्रमात अमित शाह यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
EVM वर पहिल्यांदाच बोलले अमित शाह
अमित शाह यांची काँग्रेसवर तुफान टीका
Amit Shah: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी EVM विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. यावरून भाजपला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. आता याचबाबत भाजपचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शाह यांनी EVM बाबत पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे. (bjp chanakya amit shah spoke on evm for the first time after maharashtra vidhansabha election 2024)
'आज तक'च्या अजेंडा आज तक 2024 या विशेष कार्यक्रमात अमित शाह यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेण्यात आली. यावेळी अमित शाह यांना सध्या गाजत असलेल्या EVM वर प्रश्न विचारण्यात आले. पाहा त्यावर अमित शाह नेमकं काय म्हणाले.
अमित शाह यांचं EVM वर नेमकं मत काय?
प्रश्न: सध्या EVM वर बरेच आरोप केले जात आहेत. यावर तुमचं म्हणणं काय?
अमित शाह: लोकसभा निवडणूक EVM वर झाल्या. राहुल गांधी मानतात लोकसभा निवडणुका ते जिंकले आहेत. ते मानतात.. जिंकलेले नाही.. पण ते तसं मानतात.. तर EVM बरोबर होतं?










