मुंबई: अग्निवीर ट्रेनिंग घेणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणीची Navy हॉस्टेलमध्ये आत्महत्या!
नौदलात अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेने नौदलाच्याच वसतिगृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. केरळच्या महिलेने मुंबईत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं गेल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Suicide: भारतीय नौदलामध्ये अग्निवीर (agniveer navy) म्हणून प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय महिलेने मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या (women suicide) केली आहे. ही महिला मुंबईतील आयएनएस (Mumbai INS) हमला येथे प्रशिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने वसतिगृहाच्या (Ladies Wostel) खोलीत गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला केरळची रहिवासी असून मालाडच्या पश्चिम उपनगरातील मालवणी भागातील आयएनएस हमला येथे प्रशिक्षण घेत होती.
ADVERTISEMENT
आत्महत्येचं लिहिलं कारण
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, तिच्या काही वैयक्तिक कारणामुळे महिलेने आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी या महिलेबाबत सांगितले की, तिचे प्राथमिक शिक्षण घेऊन झाल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून मुख्य प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती.
हे ही वाचा >> Crime : प्रियकराचा मुलीवर बलात्कार अन् आईला तुरूंगवासाची शिक्षा, प्रकरण काय?
देशसेवेसाठी अग्निवीर सज्ज
प्रशिक्षणार्थी महिलेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास कार्याला सुरुवात केली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात अग्निवीरची भरती केली जाते. त्याची सुरुवात 2022 मध्ये झाली होती. भारत सरकारकडून सशस्त्र दलांच्या तीनही शाखांमध्ये म्हणजे म्हणजेच लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये अग्निपथ योजना सुरु करण्यात आली होती. ही योजना मोदी सरकारकडून जून 2022 रोजी जाहीर करण्यात आली होती.
हे वाचलं का?
कुटुंबीयांशी चर्चा
प्रशिक्षणार्थी महिलेने नौदलाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. कारण अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेणारी ही महिला केरळची आहे. तिने आत्महत्या केल्याचे समजताच संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन या घटनेमागे नेमकं कारण काय त्याची माहिती पोलीस घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Abhijeet Bhattacharya : ‘शाहरूख खान लोकांचा वापर करून घेतो’, प्रसिद्ध गायक काय म्हणाला?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT