Crime : प्रियकराचा मुलीवर बलात्कार अन् आईला तुरूंगवासाची शिक्षा, प्रकरण काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

kerla minor rape case women jailed for 40 year live in partner rape daughter posco case crime news
kerla minor rape case women jailed for 40 year live in partner rape daughter posco case crime news
social share
google news

Kerala Minor rape Case : केरळमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका सात वर्षाच्या मुलीवर आईच्याच लिव्ह इन पार्टनरने (Live In Partner) बलात्कार (Rape case) केल्याची घटना घडली आहे. एकदा नव्हे तर अनेकदा या नराधमाने मुलीला वासनेचे शिकार बनवले होते. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार आईच्याच संमतीने सुरु होता. या घटनेने सध्या शहर हादरलं आहे. आता ही संपूर्ण घटना काय आहे? या घटनेतील आरोपीला काय शिक्षा झाली आहे? हे जाणून घेऊयात. (kerala minor rape case women jailed for 40 year live in partner rape daughter posco case crime news)

ही घटना 2018 दरम्यानची आहे. आरोपी महिला त्यावेळेस मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या नवऱ्याला सोडून वेगळी राहत होती. महिला त्यावेळेस तिचा लिव्ह इन पार्टनर शिशुपालन सोबत राहत होती. तिच्यासोबत तिची 7 वर्षाची मुलगी देखील होती. या मुलीवर आईचा लिव्ह इन पार्टनर बलात्कार करायचा. साधारण मार्च 2018 ते सप्टेंबर 2019 दरम्यान त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केला. इतकचं नाही तर आरोपीने पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला देखील सोडले नाही. आणि 11 वर्षाच्या मुलीवरही बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलींवरील या बलात्काराच्या घटनेला तिच्याच आईची संमती होती. तिच्याच संगमताने हा संपूर्ण घटनाक्रम घडत होता.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?

बलात्काराच्या या घटनेनंतर आरोपीने अल्पवयीन मुलींना हा संपूर्ण घटनाक्रम कुणाला न सांगण्याची तंबी देत जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून दोन्ही मुलींनी त्यांच्या आज्जीकडे धाव घेतली होती. यावेळी मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आज्जीला सांगितला. त्यानंतर आज्जीने त्यांना बालसुधार गृहात पाठवले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दोन्ही मुली बालसुधार गृहात दाखल झाल्यानंतर तिरुवनंतपुरमच्या स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणावर सूनावणी पार पडली. यावेळी स्पेशल कोर्टात महिलेला मातृ्त्वाच्या नावावर कलंक असल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसचे महिलेच्या संमतीने मुलींवर बलात्कार होत असल्याचे सिद्ध झाले. तसेच शिशूपालने केलेल्या बलात्कारामुळे पीडित मुलींना गंभीर इजा झाल्याचेही न्यायालयात सिद्ध झाले होते.

हे ही वाचा : Abhijeet Bhattacharya : ‘शाहरूख खान लोकांचा वापर करून घेतो’, प्रसिद्ध गायक काय म्हणाला?

या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत आईवर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने महिलेला 40 वर्षांचा तुरूंगवास, 20 हजार रूपयाचा दंड आणि 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने शहर हादरले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT